Stuck in a woman who sells drugs | ड्रग्स विकणाऱ्या महिलेला अटक 
ड्रग्स विकणाऱ्या महिलेला अटक 

मीरारोड - काशिमीरा भागातून अमली पदार्थ विक्री करणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. रेखा शर्मा (वय - ४५) असे आरोपी महिलेचे नाव असून ती पूजा पार्क जवळील झोपडपट्टीत राहते. सहाय्य्क पोलीस निरीक्षक संजय बांगर आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली. शर्माकडून २५ हजार रुपयांचे हेरॉईन व दिड हजारांचा गांजा सापडला आहे. शिवाय रोख रक्कम, मोबाईल असा एकूण ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मुंबईच्या मस्जिद बंदर भागातून तिने हेरॉईन आणि गांजा खरेदी केल्याचे शर्माने माहिती दिल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.