बाबाजी पाटलांचे डिपॉझिट जप्त करण्याएवढी युतीमध्ये ताकद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 10:50 PM2019-03-31T22:50:22+5:302019-03-31T22:50:40+5:30

कल्याण लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद युतीच्या भाजपा, शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

The strength in the alliance is to seize the deposit of Babaji Patil | बाबाजी पाटलांचे डिपॉझिट जप्त करण्याएवढी युतीमध्ये ताकद

बाबाजी पाटलांचे डिपॉझिट जप्त करण्याएवढी युतीमध्ये ताकद

Next

डोंबिवली: कल्याण लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बाबाजी पाटील यांचे डिपॉझिट जप्त करण्याची ताकद युतीच्या भाजपा, शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आहे. परंतु असे असले तरीही गाफिल राहू नका, अति विश्वासात राहू नका. कोणालाही कमी लेखून चालणार नाही, विजय आपलाच असला तरी तो रेकॉर्डब्रेक असावा असे आवाहन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

ते कल्याण लोकसभेच्या युतीच्या मेळाव्याचा शुभारंभ करतांना रविवारी पाटीदार भवन येथे भरवण्यात आलेल्या युतीच्या मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत होते. माजी खासदार आनंद परांजपे तिकडे गेल्यानेच विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची राजकारणात एंट्री झाली, एक युवक डॉक्टरकीचे शिक्षण घेत असतांनाच तुम्ही सगळयांनी त्याला साथ दिली आणि तो अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून आला, अशीच साथ यंदाही द्यावी. आणि देशातही फिर एक बार मोदी निवडून द्यावे. युतीचा धर्म सगळयांनीच पाळावा असे आवाहन त्यांनी केले. राज्यामध्ये युतीच्या ४८ जागांवर चांगला विजय मिळावा, यासाठी कार्यकर्त्यांनी पदाधिका-यांनी आपापल्या परिने प्रयत्न करावे सजग रहावे असेही ते म्हणाले. 

मनसेचे नेते राजू पाटील हे माझ्या शेजारी राहतात, त्यांना बंगल्यात जाऊन मी देशासाठी, सैनिकांसाठी युतीलाच मतदान करण्याचा सल्ला देणार असून ते माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे ते माझे नक्की ऐकतील. शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे यांनी काँग्रेसचे जितू भोईर तर भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक नितीन पाटील यांनी त्यांचे बंधू काँग्रेसचे नेते रवी पाटील यांनाही देशासाठी युतीला मतदान करण्याचा कानमंत्र द्यावा अशी साद राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता. ते मेळाव्यात मार्गदर्शन करतांना पुढे म्हणाले की, देशासाठी, मोदींसाठी, मुख्यमंत्र्यांसाठी आणि विद्यमान खासदार शिंदेंसाठी युतीलाच मतदान करा. त्यांनी डोंबिवली मतदार संघाचे महत्व विषद करतांना सांगितले की, या ठिकाणी युतीचा उमेदवार आणि विरूद्ध पक्षाचा उमेदवार यांना पडलेल्या मतदानाची मोजणी सुरू असतांना काहीही झाले तरी डोंबिवली मतदारसंघामध्ये युतीच्याच पारड्यात मते पडलेली असल्याचे आता नव्हे तर दिवंगत खासदार प्रकाश परांजपे यांच्या काळापासून हीच परंपरा आहे. त्यामुळे डोंबिवलीत राष्ट्रभक्तीसाठी मतदान केले जाते. त्यामुळे येथे कोणीही काळजी करण्याचे कारण नाही, हा बालेकिल्लाच आहे. तो सक्षम नेतृत्वासाठी मोदी यांना पुन्हा निवडून देण्यासाठी सज्ज आहे. भरघोस मतांनी डॉ. शिंदे निवडून येतील यात संदेह नाही. कार्यकर्त्यांनी विजयी आकड्यांकडे लक्ष द्यावे कार्यरत रहावे असे आवाहन चव्हाण यांनी केले.

विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांनी युतीमध्ये जो काही तणाव नजीकच्या काळात असेल तो वरिष्ठ पातळीवर दूर झाला असून कार्यकर्त्यांनीही त्यासंदर्भात सतर्क रहावे, मतभेद टाळावेत. देशासाठी कार्यरत रहावे. या मतदारसंघातून देशामध्ये लार्जेस्ट पातळीवर आपल्याला मतदान करून आणखी एक वेगळी छबी निर्माण करावी. त्यासाठी २९ एप्रिल रोजी जास्तीत जास्त मतदान करावे अशी विनंती त्यांनी उपस्थितांना केली.

त्यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आमदार सुभाष भोईर, आमदार नरेंद्र पवार, जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, सभापती दिपेश म्हात्रे, नगरसेवक रमेश म्हात्रे, शहरप्रमुख राजेश मोरे, एकनाथ पाटील, अ‍ॅड. आदेश भगत, आरपीआयचे नेते अंकुश गायकवाड, शिवसेनेचे नासिक जिल्हा संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, कल्याण लोकसभेचे प्रचारप्रमुख शशिकांत कांबळे आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The strength in the alliance is to seize the deposit of Babaji Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.