‘स्थायी समिती सभापती निवडणूक रद्द करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 06:32 AM2018-05-11T06:32:53+5:302018-05-11T06:32:53+5:30

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्याबाबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कशी सूचना करू शकतात, हा विषय नगरविकास खात्याशी संबंधित आहे. तसेच ते खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने पालकमंत्री याबाबत कसा काय निर्णय घेऊ शकतात, असा सवाल करून ठाणे महापालिकेतील काँग्रेस गटनेते विक्र ांत चव्हाण यांनी ही निवडणूक रद्द करावी

 'Standing Committee chairman cancels election' | ‘स्थायी समिती सभापती निवडणूक रद्द करा’

‘स्थायी समिती सभापती निवडणूक रद्द करा’

Next

ठाणे  - ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक घेण्याबाबत ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे कशी सूचना करू शकतात, हा विषय नगरविकास खात्याशी संबंधित आहे. तसेच ते खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने पालकमंत्री याबाबत कसा काय निर्णय घेऊ शकतात, असा सवाल करून ठाणे महापालिकेतील काँग्रेस गटनेते विक्र ांत चव्हाण यांनी ही निवडणूक रद्द करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे ही निवडणूक वादात सापडली आहे.
ठामपाची स्थायी समिती सभापतीची निवडणूक येत्या १६ मे ला होणार आहे. त्याकरिता, ११ मे ला उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. पण, ही निवडणूक बेकायदेशीर आहे, असा आरोप गुरु वारी काँग्रेसचे गटनेते विक्र ांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.
यावेळी त्यांनी ही निवडणूक घेण्याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्देश दिले आहेत. त्यांच्या निर्देशानुसार ही निवडणूक होत आहे, तसे पत्र महापालिकेने दिले आहे. मुळात ही निवडणूक लावण्याचा अधिकार नगरविकास खात्याकडे असताना पालकमंत्री याबाबत कसे काय निर्देश देऊ शकतात. तर, मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खात्याचा कारभार शिवसेनेकडे सोपवला आहे का, असा सवाल करून पालघर निवडणुकीत पालकमंत्री एकीकडे भाजपाच्या विरोधात आघाडीवर असताना ठाण्यात कोणती अडचण झाली आहे की, भाजपाने त्यांच्यासमोर नांगी टाकली आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच नगरविकास खात्याचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना अंधारात ठेवून काम करत आहेत का, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

आदेशाला केराची टोपली

कोकण आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून स्थायी समिती गैरमार्गाने मिळवण्याचा सेनेचा डाव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर, ठामपाच्या तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात ठेवण्यासाठी शिवसेनेचा हा प्रयत्न आहे. मुखमंत्र्यांनी या निवडणुकीला स्थगिती द्यावी.

Web Title:  'Standing Committee chairman cancels election'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.