Sports with patients' lives; Insulin found in the bottle | रुग्णांच्या जीवाशी खेळ; इंजेक्शनच्या बाटलीत आढळली अळी
रुग्णांच्या जीवाशी खेळ; इंजेक्शनच्या बाटलीत आढळली अळी

ठळक मुद्दे इंजेक्शनच्या बाटलीत चक्क अळी तरंगताना आढळून आल्याचा धक्कादायक प्रकारउल्हासनगरमधील प्लॅटिनम रूग्णालयात हा प्रकार घडलामहिलेच्या पतीने रुग्णालयाच्याच प्लॅटिनम मेडिकलमधून विकत घेतले.

उल्हासनगर - उल्हासनगर कॅम्प ३ परिसरामध्ये इंजेक्शनच्या बाटलीत चक्क अळी तरंगताना आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. उल्हासनगरमधील प्लॅटिनम रूग्णालयात हा प्रकार घडला. मात्र, रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला असता तुमचा पेशंट घेऊन जा, असं उद्धट उत्तर देण्यात आल्याचा आरोप महिलेच्या पतीनं केला आहे.

प्लॅटिनम रुग्णालयात एक महिला गर्भाशयाच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल झाली होती. या महिलेला लागणारं इंजेक्शन डॉक्टरांनी लिहून दिल्यानंतर महिलेच्या पतीने रुग्णालयाच्याच प्लॅटिनम मेडिकलमधून विकत घेतले. मात्र, इंजेक्शनच्या बाटलीत त्यांना अळी तरंगताना दिसली. याबाबत मेडिकल विक्रेत्याकडे विचारणा केली असता त्याने कंपनीवर जबाबदारी ढकलली. त्यामुळे याला जबाबदार कोण? असा सवाल या महिलेच्या पतीने विचारला आहे.  


Web Title: Sports with patients' lives; Insulin found in the bottle
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.