देशभक्तीपर गीतांनी रंगला ठाण्यातील अत्रे कट्टा, स्वातंत्र्यदिनानिमित्त समरगीतांचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2018 04:37 PM2018-08-16T16:37:12+5:302018-08-16T16:42:27+5:30

आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने श्रीपाद कुलकर्णी आणि त्यांच्या सहकलाकारांचा समरगीतांचा कार्यक्रम आयोजित केला होता.

The songs of patriotic songs in Thane, at the time of Independence Day celebrations | देशभक्तीपर गीतांनी रंगला ठाण्यातील अत्रे कट्टा, स्वातंत्र्यदिनानिमित्त समरगीतांचा कार्यक्रम

देशभक्तीपर गीतांनी रंगला ठाण्यातील अत्रे कट्टा, स्वातंत्र्यदिनानिमित्त समरगीतांचा कार्यक्रम

Next
ठळक मुद्देदेशभक्तीपर गीतांनी रंगला ठाण्यातील अत्रे कट्टास्वातंत्र्यदिनानिमित्त समरगीतांचा कार्यक्रमकार्यक्रमाचा शेवट ‘सारे जहाँसे अच्छा’ या गीताने

ठाणे : स्वातंत्र्य दिनानिमित्त अत्रे कट्ट्यावर गायक श्रीपाद कुलकर्णी आणि त्यांचे सहकलाकारांनी समरगीतांचा कार्यक्रम सादर केला. यावेळी त्यांनी देशभक्तीपर गीते सादर करुन उपस्थित रसिकांची मने जिंकली.
    कार्यक्रमाची सुरूवात अंजली कानविंदे यांनी सादर केलले्या ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताने झाली. श्रीपाद कुलकर्णी यांनी ‘जयोस्तुते’, ‘मेरे देस की धरती’, ‘शुर आम्ही सरदार आम्हाला’ ही गीते सादर केली. यात अनिष नावलकर, वंशिका कुबल आणि सायली गायतोंडे या तरुण कलाकारांचा सहभाग होता. श्रीपाद कुलकर्णी यांनी सादर केलेल्या ‘जयोस्तुते’ या गीताला रसिकांनी टाळ््यांची भरभरुन दाद मिळाली तर अनिष नावलकर, राहुल वरवडेकर यांनी सादर केलेल्या ‘संदेसे आते है’ या गीतालाही रसिक श्रोत्यांनी वाहवाची दाद दिली. राहुल वरवडेकर यांनी ‘कर चले हम फिदा’, सायली गायतोंडे यांनी ‘भारत हम को जानसे प्यारा है’, वंशिका कुबल यांनी ‘झेंडा उँचा रहे हमारा’, प्रेरणा वरवडेकर यांनी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला’, वंशिका कुबल यांनी ‘हम होंगे कामयाब’, सायली गायतोंडे यांनी ‘ये जो देस है तेरा’, ही गाणी यावेळी सादर केली. कार्यक्रमाचा शेवट कानविंदे यांनी सादर केलेल्या ‘सारे जहाँसे अच्छा’ या गीताने झाला. आशिष नाईक यांनी आपल्या निवेदनातून प्रत्येक गाण्याची माहिती दिली.

Web Title: The songs of patriotic songs in Thane, at the time of Independence Day celebrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.