समस्यांबाबत शासन आणि प्रशासनाला जाबविचारुन जनरेट्याने प्रश्न सोडवा - मेजर मनिषसिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 05:31 PM2019-03-24T17:31:28+5:302019-03-24T17:34:43+5:30

मेजर मनिषसिंग यांनी युवकांशी संवाद साधला व त्यांना आपल्या ओघवत्या शैलीत मार्दर्शन केले.

Solve questions generously on government and administration about issues - Major Manish Singh | समस्यांबाबत शासन आणि प्रशासनाला जाबविचारुन जनरेट्याने प्रश्न सोडवा - मेजर मनिषसिंग

समस्यांबाबत शासन आणि प्रशासनाला जाबविचारुन जनरेट्याने प्रश्न सोडवा - मेजर मनिषसिंग

googlenewsNext
ठळक मुद्देमेजर मनिषसिंग यांनी साधला युवकांशी संवाद शासन आणि प्रशासनाला जाब विचारा : मेजर मनिष सिंगदुसऱयांकडून अपेक्षा करु नका. विचारांनाऍक्शनची जोड द्या : मेजर मनिष सिंग

ठाणे : कोणत्याही समस्या, प्रश्न असलेतर शासन आणि प्रशासनाकडे बोट दाखविलेजाते. तुमच्या आजुबाजुला दिसणाऱया समस्या,प्रश्नांबाबत तुम्ही शासन आणि प्रशासनाला जाबविचारा. जनरेट्याने ते प्रश्न सोडविणे त्यांना भागआहे. सतत वाचन करत रहा, असे मोलाचेमार्गदर्शन शौर्य चक्र प्राप्त मेजर मनिष सिंगयांनी आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठ रात्रमहाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधतांनाकेले.

रघुनाथ नगर येथील शारदा एज्युकेशनसोसायटी संचालित आनंद विश्व गुरुकुल ज्येष्ठमहाविद्यालयात मेजर मनिष सिंग यांचाविद्यार्थ्यांशी संवादात्मक कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आलाहोता. मेजर मनिष सिंग यांनी मिष्कील पणसडेतोडपणे मार्गदर्शन करत अनेक मुद्यांना हातघातला. प्रारंभी मेजर मनिष सिंग यांचेमहाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखितेयांनी स्वागत केले. यावेळी व्यासपिठावरभाग्यश्री फाऊंडेशचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र खेर,प्राचार्य ऍड. सुयश प्रधान, विनायक जोशी,सिध्देश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते.भाग्यश्री फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा, प्रसिध्दलेखिका शिल्पा खेर यांनी मेजर मनिष सिंगयांच्या कतृत्वाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.लष्कराच्या शौर्याचे चित्रपट बनतात आणि तेपाहिले जातात. हाऊ ईज द जोश बोलले जाते.चित्रपटाच्या नायकांकडे पाहून आम्ही कोण असाप्रश्न पडतो. मात्र चित्रपट आणि वास्तव यातफरक आहे. सर्जिकल स्ट्राईक इतके सोपे नसते.रात्रीच्या काळोखात गुपचुप जाऊन काम फत्तेकेल्यानंतर केलेल्या कामाचा आवाज होतो.भारतीय सैन्याला आज पर्यंत कोठेही अपयशआलेले नाही. त्यामुळे चित्रपट कमी बघा आणिवाचनावर अधिक भर द्या, असा सल्ला मेजरमनिष सिंग यांनी विद्यार्थ्यांना दिला. 

पुलवाना येथे घडलेल्या दहशदवादी हल्ल्यातएकत्रित अनेक जवान शहीद झाल्यानंतर देशहादरला. मात्र रोज जवान शहीद होत आहेत.आपला एक जरी जवान शहीद झाला तरी तेयुध्दच आहे, असे मेजर मनिष सिंग म्हणाले. 

 देशभक्ती हा चर्चा करण्याचा विषय नाही. प्रत्येकजवान हा देशाची ड्युटी करत असतो. आईवडील, शिक्षक हे मुलांना शिकवितात तसेचसफाई कामगार स्वच्छतेचे काम करतो, ही पणएक ड्युटीच आहे. ते ती प्रामाणिकपणे करतात.विद्यार्थ्यांनीही आपली वैयक्तिक ड्युटी काय आहेती ओळखली पाहिजे. मी स्वच्छता ठेविन.परिसरातील साफसफाई होत नसेल तर मीनगरसेवकाला जाब विचारेन. झुंड एकत्र येऊनदेशभक्ती होत नाही. जबाबदारीने वागणे आणिस्वत: योगदान देणे ही देशभक्ती आहे असे मेजरमनिष सिंग म्हणाले. काश्मिर मधील नागरिकांबद्दल नेहमीचप्रश्नचिन्ह उभे केले जाते. मात्र इतर राज्यांत कायपरिस्थिती आहे. मी गोळी लागुन जखमी झालोतेव्हा मला मदतीचा हात बारामुल्लामधीलस्थानिकानेच दिला, अशी आठवण यावेळी मेजरमनिष सिंग यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांनासांगितली.

शासन कसे असले पाहिजे हे तुम्ही ठरवता.लोकशाही म्हणजे फक्त मतदान नव्हे.लोकशाहीच्या प्रवाहात राहून शासनाला सुईसारखे टोचत राहिले पाहिजे. मग ते कोणाचेहीसरकार असू दे. निर्भयाच्या घटनेनंतर कायद्यातमहत्वपूर्ण बदल झाले हे फक्त जनरेट्यामुळेशक्य झाल्याचे मेजर मनिष सिंग म्हणाले.आयुष्य मजेत जगा. वाचा आणि विचार करा.भोवतालच्या प्रश्नांची सोडवणुक कशी होईल तेबघा. दुसऱयांकडून अपेक्षा करु नका. विचारांनाऍक्शनची जोड द्या असे मेजर मनिष सिंग म्हणाले.

Web Title: Solve questions generously on government and administration about issues - Major Manish Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.