चापट मारणे बेतले तरुणाच्या जीवावर, क्षुल्लक वादातून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 03:07 AM2017-11-24T03:07:47+5:302017-11-24T03:08:08+5:30

कल्याण : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात चापट मारली म्हणून रागाच्या भरात १६ वर्षांच्या मुलाने आणि त्याच्या बापाने २२ वर्षांच्या तरुणाची हत्या केल्याची घटना येथील पूर्वेकडील नेतिवली, सूचकनाका परिसरात बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली.

The slap on the life of the assassin, the murder of the trivial argument | चापट मारणे बेतले तरुणाच्या जीवावर, क्षुल्लक वादातून हत्या

चापट मारणे बेतले तरुणाच्या जीवावर, क्षुल्लक वादातून हत्या

Next

कल्याण : क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात चापट मारली म्हणून रागाच्या भरात १६ वर्षांच्या मुलाने आणि त्याच्या बापाने २२ वर्षांच्या तरुणाची हत्या केल्याची घटना येथील पूर्वेकडील नेतिवली, सूचकनाका परिसरात बुधवारी रात्री ८.३० च्या सुमारास घडली. या हत्येप्रकरणी बापलेकाला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.
सूचकनाका, रामनगर भागात राहणाºया आफताब आलमयार महमद खान ऊर्फ बबलू (वय २२) याचे त्याच परिसरात राहणाºया १६ वर्षांच्या मुलाबरोबर क्षुल्लक कारणावरून भांडण झाले. या वादात आफताब याने त्या अल्पवयीन मुलाच्या गालावर चापट मारली होती. ही बाब मुलाने आपल्या वडिलांना सांगितली. याचा जाब विचारण्यासाठी अल्पवयीन मुलगा आणि वडील कलिम करमुद्दीन शेख यांनी आफताबला रस्त्यात गाठले. या वेळी कलिम आणि आफताबमध्ये जोरदार वाद झाला. यात कलिम आणि त्यांच्या मुलाने आफताबला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आफताबला ठोशाबुक्कयांनी मारहाण करताना यात त्याच्या गुप्तांगावर प्रहार केल्याने आफताबचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार सूचकनाका, रामनगर भागातील एस.के. ट्रेडर्स या दुकानाजवळच घडला.
याप्रकरणी असदअली खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी बापलेकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, गुन्हा घडल्यानंतर आरोपी बाप आणि लेक हे दोघेही स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले.

Web Title: The slap on the life of the assassin, the murder of the trivial argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे