ठाण्यातील लुईसवाडीत स्लॅब कोसळला, तरुण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 06:24 PM2018-09-18T18:24:24+5:302018-09-18T18:34:25+5:30

दहिसर पूर्वेतील स्थानकाजवळील रेल्वे कॉलनी इमारत क्रमांक २८ मध्ये लांजेकर कुटुंबिय राहतात. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास लांजेकर कुटुंबिय झोपण्यासाठी अंथरूण टाकत असतानाच इमारतीचा स्लॅब कोसळला

Slab collapses in Lewiswadi Thane, young injured | ठाण्यातील लुईसवाडीत स्लॅब कोसळला, तरुण जखमी 

ठाण्यातील लुईसवाडीत स्लॅब कोसळला, तरुण जखमी 

Next

ठाणे - दहिसर पूर्वेतील स्थानकाजवळील रेल्वे कॉलनी इमारत क्रमांक २८ मध्ये लांजेकर कुटुंबिय राहतात. शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास लांजेकर कुटुंबिय झोपण्यासाठी अंथरूण टाकत असतानाच इमारतीचा स्लॅब गणेशोत्सवानिमित्त माहेरी आलेल्या लांजेकरांच्या मुलीच्या शेजारी पडला. त्यात लांजेकर जखमी झाल्या. तर आज ठाणे पश्चिम येथील लुईसवाडीतील प्रज्ञाधाम सोसायटीत घरातील स्लॅब कोसळल्याने २४ वर्षीय तरुण जखमी झाला आहे. 

दहिसर येथील दुर्घटनेत महिला  किरकोळ जखमी झाली. मात्र स्लॅब कोसळल्याच्या आवाजामुळे इमारतीतील इतर रहिवाशांनी लांजेकरांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. जीर्ण झालेल्या इमारती पावसाच्या पाण्याने भुसभूशीत झाल्या होत्या. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे तक्रार करूनसुद्धा अद्याप कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत. त्यामुळे रेल्वे कर्मचारी भीतीच्या सावटाखाली रहात आहेत. तर ठाण्यातील दुर्घटनेत २४ वर्षीय तरुण गंभीर  जखमी झाला असून घरातील सामानाचे देखील नुकसान झाले आहे. 

ठाणे

दहिसर 

Web Title: Slab collapses in Lewiswadi Thane, young injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे