भिवंडीतील गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरम पानाफुलांचा हार घालून श्रमजीवीचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2019 09:50 PM2019-01-08T21:50:39+5:302019-01-08T21:54:08+5:30

भिवंडी : तालुक्यातील आदिवासी वस्ती व पाड्यावर मुलभूत सोयीसुविधांच्या वारंवार मागण्या करूनही त्यावर कारवाई न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या पदाधिका-यांनी ...

Shreeji Swachhivi movement by throwing the necklace to the chairmanship of Bhiwandi Group Development Officer | भिवंडीतील गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरम पानाफुलांचा हार घालून श्रमजीवीचे आंदोलन

भिवंडीतील गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला बेशरम पानाफुलांचा हार घालून श्रमजीवीचे आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देआदिवासी वस्ती व पाड्यावर मुलभूत सोयीसुविधांच्या मागण्याकडे दुर्लक्ष आश्वासन देऊन नाही केली आठ दिवसांत कारवाई गटविकास अधिकाºयांच्या गैरहजेरीत खुर्चीला बेशरम पानाफुलांचा हार

भिवंडी: तालुक्यातील आदिवासी वस्ती व पाड्यावर मुलभूत सोयीसुविधांच्या वारंवार मागण्या करूनही त्यावर कारवाई न केल्याने श्रमजीवी संघटनेच्या पदाधिका-यांनी भिवंडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के यांना बेशरम या जंगली झाडाची फुले पाने यापासून बनविलेला हार घालून त्यांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला होता. परंतू ते कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांच्या खुर्चीचा उपरोधिक सन्मान करण्यात आला.या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.
तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायतीतील आदिवासी वस्ती व पाड्यांवर मुलभूत नागरी सुविधा उपलब्ध नसल्याने श्रमजीवी संघटनेच्या वतीने वारंवार अधिकाºयांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसेच या मागण्यांचा पाठपुरावा करण्याच्या निमीत्ताने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोनटक्के यांच्याकडे लेखी निवेदन दिले आहेत.त्यांनी मागील महिन्यात १७ डिसेंबर रोजी संघटनेच्या शिष्टमंडळास आठ दिवसात समस्यांचा निराकरण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतू प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के हे जबाबदार असल्याचा ठपका ठेवीत श्रमजीवी संघटनेच्या पदाधिकाºयांनी त्यांचा उपरोधिक सन्मान करण्याचा निर्णय घेतला. आज मंगळवार रोजी दुपारी श्रमजीवी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील लोणे, महिला ठिणगी प्रमुख जया पारधी, संगीता भोमटे, यांच्या नेतृत्वाखाली युएव्ही पदाधिकारी सागर देशक, गणेश सापटे, मुकेश भांगरे, गणपत हिलम,लक्ष्मी मुकणे या प्रमुख पदाधिकाºयांनी गटविकास अधिकारी यांच्या दालनात जाऊन त्यांच्या खुर्चीस बेशरम या जंगली झाडाच्या पानाफुलां पासून बनविलेला हार अर्पण करीत संताप व्यक्त केला. ‘आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरच्या लढाईस श्रमजीवी संघटना तयार असून प्रत्येक वेळी मोर्चे आंदोलने केली आहेत. आदिवासी समाजास व इतर नागरिकांना त्रास देण्यापेक्षा त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. परंतू या सुविधा न देणा-या प्रशासनातील निगरगट्ट अधिकाºयांचा असा उपरोधिक सन्मान भविष्यात केला जाईल.’असा इशारा संघटनेचे पदाधिकारी सागर देशक यांनी दिला आहे . दरम्यान गटविकास अधिकारी अशोक सोनटक्के हे चार दिवसांच्या प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेले असल्याने त्यांची प्रतिक्रि या समजू शकली नाही .

Web Title: Shreeji Swachhivi movement by throwing the necklace to the chairmanship of Bhiwandi Group Development Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.