शिमला महोत्सवात ‘शूटिंग शूटिंग’ने मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 12:08 AM2019-06-15T00:08:32+5:302019-06-15T00:08:45+5:30

नाटकाला प्रथम पारितोषिक : समय तांबे, स्वर्णिम देशपांडे यांना उत्कृष्ट अभिनयाचे बक्षीस

 Shooting shooting 'at the Shimla Festival | शिमला महोत्सवात ‘शूटिंग शूटिंग’ने मारली बाजी

शिमला महोत्सवात ‘शूटिंग शूटिंग’ने मारली बाजी

Next

डोंबिवली : आॅल इंडियन आर्टिस्ट असोसिएशन, शिमलातर्फे झालेल्या ६४ व्या नृत्य, नाट्य राष्टÑीय महोत्सवात डोंबिवलीतील श्रीकला संस्कार व वेध अ‍ॅकॅडमीच्या ‘शूटिंग शूटिंग’ या हिंदी नाटकाने प्रथम पारितोषिक पटकावून बाजी मारली आहे. तसेच समय तांबे आणि स्वर्णिम देशपांडे यांना उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

आनंद म्हसवेकर यांनी ‘शूटिंग शूटिंग’ हे नाटक लिहिले असून ते मूळ मराठी भाषेत आहे. या नाटकात १५ कलाकार होते. ७ ते १० जूनदरम्यान झालेल्या या महोत्सवात २२ राज्यांतून कलाकार आले होते. बालनाट्य स्पर्धेत २२ नाटके, तर नृत्य स्पर्धेत विविध प्रकारची ३२२ नृत्य सादर करण्यात आली. श्रीकला संस्कार संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना स्पर्धांसाठी तयार करून महाराष्टÑाबाहेर घेऊ न जाते.
शिमला येथील महोत्सवात श्रीकला संस्कार आणि वेध अ‍ॅकॅडमी या संस्था प्रथमच सहभागी झाल्या होत्या. या संस्थेतर्फे दिपाली काळे, सुवर्णा केळकर, सायली शिंदे, कलाकार आणि त्यांचे पालक हे या स्पर्धेसाठी शिमला येथे गेले होेते.
नाटकाचे दिग्दर्शन वृषांक कवठेकर आणि संकेत ओक यांनी केले आहे. वेशभूषेची बाजू पालकांनी सांभाळली. ‘नटश्री’च्या नृत्यालंकार सायली शिंदे व त्यांचे विद्यार्थीही शिमला येथील महोत्सवात सहभागी झाले होते. त्यांनी शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि लोकनृत्य सादर केली. या गु्रपनेही दहा पारितोषिके मिळवली आहेत. कनिका शिंदे, लतिका राजागणेश, युक्ता जोशी, अमृता फडके, किमया पाटील, यशश्री मालपाठक, प्राची सामंत, मीरा महाजन, जान्हवी पाटील यांनी सहभाग घेतला होता. सुप्रिया नारकर यांनी राजस्थानी लोकनृत्य सादर क रून खुल्या गटातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. नारकर यांच्यावर मागील महिन्यात एक शस्त्रक्रिया झाली होती. तरीही केवळ जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश मिळवले आहे. स्मिता धुमाळ यांनी वेस्टर्न नृत्यातील तिसरे पारितोषिक मिळविले आहे.

उदयपूर येथील कार्निव्हलचे आमंत्रण
पर्यावरणीय समतोल या गंभीर विषयावर हे नाटक आधारित आहे. यामध्ये माणूस जंगली प्राण्यांसोबत राहून त्यांच्या मुलाखती घेतो. यातून प्राण्यांच्या विविध समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

या नाटकाने अनेक पारितोषिके पटकावली आहेत. महाराष्टÑ, ओरिसा आदी ठिकाणी झालेल्या स्पर्धांत हे नाटक सादर झाले आहे. उदयपूर येथे सप्टेंबरमध्ये होणाऱ्या कार्निव्हलसाठी आमंत्रित करण्यात आले आहे.

Web Title:  Shooting shooting 'at the Shimla Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.