कल्याण तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 06:04 AM2017-10-18T06:04:49+5:302017-10-18T06:05:04+5:30

कल्याण तालुक्यात सोमवारी झालेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदाच्या निवडणुकीत नऊपैकी पाच ठिकाणी शिवसेनेचे सरपंच निवडून आले.

 Shivsena domination in Kalyan taluka | कल्याण तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व  

कल्याण तालुक्यात शिवसेनेचे वर्चस्व  

Next

म्हारळ / बिर्ला गेट : कल्याण तालुक्यात सोमवारी झालेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच पदाच्या निवडणुकीत नऊपैकी पाच ठिकाणी शिवसेनेचे सरपंच निवडून आले. भाजपाचे दोन तर एक अपक्ष सरपंच विजयी झाला. दरम्यान, वेहळे ग्रामपंचायतीत कोणाचाच अर्ज न आल्याने हे पद रिक्त घोषित करण्यात आले आहे.
तालुक्यातील पळसोली, वासुंर्दी, कोसला, गेरसे, वसत शेलवले, काकडपाडा वेहळे, नांदप आणि कुंदे या ग्रामपंचायतींची निवडणूक सोमवारी झाली. या निवडणुकीत सदस्यपदासाठी ७५ तर सरपंचपदांकरता २५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. वेहळे ही ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. त्यामुळे मंगळवारी उर्वरित आठ ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. त्यात सरपंचपदी गेरसे येथे बाळाराम दिवाणे (३१३ मते), काकपाडा येथे प्रवीण चौधरी (२६१ मते), कुंदे येथे जागृती देवकर (२५५ मते), वासुंद्री रवीश तांडेल (२५३ मते), वसत-शेलवली मधुकर राणे (मते ४५४) हे शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. पळसोलीच्या विनोद शेंडे यांची बिनविरोध निवड झाली. कोसला येथे शिवाजी पालवी (३१५ मते) आणि नांदप येथे अनंता शेलार (१७५ मते) विजयी झाले.
दरम्यान, अच्छे दिन कोण आणणार हे आता नागरिकांना कळून चुकले आहे. प्रत्येकाला स्वत:लाच अच्छे दिन आणावे लागणार आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी
दिली आहे.

Web Title:  Shivsena domination in Kalyan taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.