भिवंडीतही शिवसेनेत बंड!, स्थानिकांना डावलून पदाधिकारी लादण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 01:58 AM2018-01-20T01:58:12+5:302018-01-20T01:58:25+5:30

पालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून पालिका हद्दीबाहेरील व्यक्तीची निवड करण्याचा आदेश दिल्याने नाराज शिवसैनिकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे

Shiv Sena's rebellion in Bhiwandi, efforts are being made to oust the locals | भिवंडीतही शिवसेनेत बंड!, स्थानिकांना डावलून पदाधिकारी लादण्याचा प्रयत्न

भिवंडीतही शिवसेनेत बंड!, स्थानिकांना डावलून पदाधिकारी लादण्याचा प्रयत्न

Next

भिवंडी : पालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी हस्तक्षेप करून पालिका हद्दीबाहेरील व्यक्तीची निवड करण्याचा आदेश दिल्याने नाराज शिवसैनिकांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे. पालकमंत्र्यांनी या नियुक्तीत हस्तक्षेप करू नये, असा आक्षेप काही नगरसेवकांनी घेतला असून यानंतरही ग्रामीण भागातील उमेदवार लादला, तर त्याचा परिणाम लोकसभा- विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळेल, असा इशारा दिल्याने वातावरण चिघळले आहे.
एकीकडे भिवंडीतील १८ नगरसेवकांवर निलंबनाची टांगती तलवार असल्याने भिवंडीतील राजकीय चित्र बदलेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यातच स्वीकृत सदस्य निवडीवरून वातावरण तापले आहे. त्यातच शहापूरपाठोपाठ भिवंडीतही पक्षातील नाराजी उफाळून आली आहे.
सहा महिन्यापूर्वी झालेल्या पालिका निवडणुकीत काँग्रेस ४७, भाजपा २०, शिवसेना १२, समाजवादी २, कोनार्क विकास आघाडी ४, अपक्ष २, आरपीआय (ए) ४ असे पक्षीय बलाबल आहे. सध्या स्वीकृत सदस्यासाठी मोठे अर्थकारण सुरू आहे. नगरसेवकांच्या संख्येनुसार काँग्रेसचे तीन, शिवसेनेचा एक आणि भाजपाचा एक स्वीकृत सदस्य निवडला जाणार आहे. त्यासाठी शिवसेनेत आतापर्यंत २० जणांनी शहरप्रमुख सुभाष माने यांच्याकडे नावे दिली आहेत. ही स्पर्धा तीव्र असतानाच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशेळीचे माजी सरपंच आणि एमएमआरडीए सदस्य देवानंद थळे यांच्या नावाची शिफारस केल्याने शिवसैनिकांसह नगरसेवकांमध्ये प्रचंड नाराजीची लाट उसळली. शिंदे यांच्या निर्णयावर विचारासाठी शहरप्रमुख सुभाष माने यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे उपमहापौर मनोज काटेकर यांच्या दालनात नगरसेवक व पदाधिकाºयांच्या मिटींगला गटनेते संजय म्हात्रे, मदन नाईक, बाळाराम चौधरी यांच्यासह अन्य नगरसेवक उपस्थित होते. त्यात स्थानिक पदाधिकारी किंवा शहरातील शिवसैनिकांच्या नियुक्तीची मागणी पुढे आली. पालकमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करू नये, असा सूर लावत नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. स्थानिक पदाधिकाºयांलाच सदस्यपद मिळावे, या मागणीसाठी शिवसेनेचे नगरसेवक एकवटले असून त्यांनी पालकमंत्र्यांविरोधात बंडाची भाषा सुरू केली आहे. महापालिका निवडणुकीत तिकीट वाटपावरून शिवसैनिकांत पसरलेलेला संताप कमी होत नाही, तोच ही बंडाची भाषा सुरू झाली आहे.

Web Title: Shiv Sena's rebellion in Bhiwandi, efforts are being made to oust the locals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.