शहापूर तालुक्यात शिक्षकांची २०५ पदे रिक्त, सात मुख्याध्यापकही नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 02:23 AM2018-01-23T02:23:36+5:302018-01-23T02:23:55+5:30

राइट टू एज्युकेशन म्हणजेच शासनाच्या शिक्षणहक्क कायद्यानुसार विद्यार्थी संख्येनुसार शहापूर तालुक्यात तब्बल २०५ शिक्षकांची गरज आहे.

 In Shahapur taluka, 205 posts of teachers are not vacant, there are no seven headmasters | शहापूर तालुक्यात शिक्षकांची २०५ पदे रिक्त, सात मुख्याध्यापकही नाहीत

शहापूर तालुक्यात शिक्षकांची २०५ पदे रिक्त, सात मुख्याध्यापकही नाहीत

Next

भातसानगर : राइट टू एज्युकेशन म्हणजेच शासनाच्या शिक्षणहक्क कायद्यानुसार विद्यार्थी संख्येनुसार शहापूर तालुक्यात तब्बल २०५ शिक्षकांची गरज आहे. मात्र, आता वर्ष संपत आले तरीही ते न मिळाल्याने मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची कमतरता भासते आहे.
शहापूरसारख्या आदिवासीबहुल तालुक्यात शिक्षणहक्क कायद्याची अंमलबजावणी होणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज ज्या शाळांची पटसंख्या २० विद्यार्थ्यांपेक्षाही कमी आहे, अशा शाळांतील विद्यार्थ्यांचे जवळच्याच शाळेत समायोजन करू पाहत आहेत. मात्र, दुसरीकडे शहापूर तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षक देण्याची मागणी होत असतानाही ते दिले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ४५८ शाळा असून त्यामध्ये २२ हजार ७१३ विद्यार्थी शिकतात. त्यांना शिकवण्याचे काम एक हजार १०८ शिक्षक करत आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार अजून २०५ शिक्षकांची गरज असतानाही ते दिले गेले नाहीत. तर, दुसरीकडे एकूण ३४ मुख्याध्यापकांची मागणी असताना तालुक्यात सात मुख्याध्यापकांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे आज ज्या शाळांना मुख्याध्यापक नाहीत, त्या शाळेतील मुख्याध्यापकांची जबाबदारी सहायक शिक्षक सांभाळत आहेत. त्यातच एखाद्या महत्त्वपूर्ण कागदपत्रांवर सही करायची असल्यास मोठी अडचण निर्माण होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालक वर्गामध्ये देखील नाराजी आहे.
आरटीईनुसार तालुक्यात २०५ शिक्षकांची गरज आहे, त्यानुसार आपण वरिष्ठ पातळीवर मागणी केली आहे. मात्र, शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.
- आशीष झुंजारराव, गटशिक्षणाधिकारी शहापूर
शहापूर तालुक्यात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून आवश्यक शिक्षक नेमण्याची मागणी करणार.
-संजय निमसे,
जि.प. सदस्य, शहापूर)

Web Title:  In Shahapur taluka, 205 posts of teachers are not vacant, there are no seven headmasters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.