प्रियकरासाठी ‘सावित्री’नेच केला पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 11:54 PM2018-12-13T23:54:56+5:302018-12-13T23:55:33+5:30

पत्नीसह तिघांना अटक; आधुनिक तंत्रज्ञानाने उलगडले हत्येचे गूढ

Savitri's husband made the murder of husband | प्रियकरासाठी ‘सावित्री’नेच केला पतीचा खून

प्रियकरासाठी ‘सावित्री’नेच केला पतीचा खून

Next

अंबरनाथ : सहा महिन्यांपूर्वीच्या एका खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अखेर यश मिळाले. शिरच्छेद केलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घ्यावी लागली. पत्नी सावित्रीच्या विवाहबाह्य संबंधांतून हे हत्याकांड झाल्याचे धक्कादायक वास्तव या प्रकरणाच्या तपासातून उघड झाले.

१० एप्रिल २०१८ रोजी अंबरनाथमधील महेंद्र नगर येथील टेकडीवर मुंडके नसलेला मृतदेह आढळला होता. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी मृतदेहापासून काही अंतरावर फेकलेले मुंडके शोधून काढले. मृतदेह कुजल्याने त्याची ओळख पटवणे अवघड जात होते. मृतदेहाच्या हातावर चांद हे नाव गोंदलेले होते. त्या नावावरूनही पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र सहा महिने उलटूनही पोलिसांना यश आले नाही.

सर्वत्र शोध घेऊनही यश येत नसल्याने साहायक पोलीस आयुक्त सुनील पाटील यांनी डॉ. हरिष पाठक यांची मदत घेतली. मृत व्यक्तीच्या चेहऱ्याच्या सांगाड्यावरून थ्री डायमेंशन तंत्रज्ञानाच्या आधारे संगणकावर काल्पनिक चेहरा तयार केला. या चेहºयाचा अंदाज घेऊन पोलिसांनी मृताचे चित्र रेखाटले. त्यानंतर तपासाला खºया अर्थाने गती मिळाली. ज्या ठिकाणी मृतदेह सापडला होता, त्या ठिकाणापासून काही अंतरावर असलेल्या महेंद्रनगर भागातच अशी व्यक्ती राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी मृताचे सायन कोळीवाडा भागातील मूळ घर शोधून काढले. या भागात चौकशी केल्यानंतर त्याचे नाव बिंद्रेश प्रजापती असून, तो वाहन चालक असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याची पत्नी सावित्री हिला विचारपूस केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी सखोल चौकशी केली असता, सावित्रीचे त्याच भागातील किसनकुमार कनोजीया याच्यासोबत विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती उघड झाली. खात्री पटल्यावर पोलिसांनी सावित्री आणि किसनकुमार दोघांना ताब्यात घेतले. त्यांनी पोलिसांजवळ खुनाची कबुली दिली. प्रेमसंबंधात सावित्रीला पतीचा अडसर नको होता. त्यामुळे त्याला संपविण्याचा कट त्यांनी रचला. त्यासाठी किसनकुमारने त्याचा मित्र राजेश यादव याची मदत घेऊन ब्रिंदेशचा खून केल्याची माहिती आरोपींच्या सखोल चौकशीतून उघडकीस आली.

मृताचा केला होता शिरच्छेद
आरोपींनी बिंद्रेशला दारू पाजण्याच्या बहाण्याने अंबरनाथ येथील महेंद्रनगर भागात नेले. तिथे दारू पाजून त्याची हत्या केली. ओळख पटू नये म्हणून बिंद्रेशचे मुंडके धडावेगळे करून ते ५०० मीटर अंतरावर फेकण्यात आले. अंबरनाथ पोलिसांनी ब्रिंदेशच्या पत्नीसह तिघांना अटक केली असून, त्यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Savitri's husband made the murder of husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.