संजय गांधी उद्यानातील जंगल पेटले; वनविभागाचे अधिकारी फिरकलेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 11:54 PM2019-03-24T23:54:00+5:302019-03-24T23:54:13+5:30

काशिमीराच्या माशाचापाडाजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवार सकाळपासून जंगलाने पेट घेतला आहे. त्यामुळे वन्यजीवांची होरपळ व पळापळ सुरू आहे.

 Sanjay Gandhi burnt in forest; Forest officer did not turn up | संजय गांधी उद्यानातील जंगल पेटले; वनविभागाचे अधिकारी फिरकलेच नाही

संजय गांधी उद्यानातील जंगल पेटले; वनविभागाचे अधिकारी फिरकलेच नाही

Next

मीरा रोड : काशिमीराच्या माशाचापाडाजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रविवार सकाळपासून जंगलाने पेट घेतला आहे. त्यामुळे वन्यजीवांची होरपळ व पळापळ सुरू आहे. आग भडकत चालली असून ती आटोक्यात आणली नाही, तर मोठ्या प्रमाणात जंगल भस्मसात होण्याची भीती आहे. आगीबाबत अनेकवेळा कळवूनही वनविभागातून कुणी अधिकारी, कर्मचारी फिरकला नाही. त्यामुळे या आगीत भूमाफियांसह वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. अग्निशमन दलानेही आपले हात झटकले.
माशाचापाडाजवळ असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील डोंगरावर आग भडकल्याची माहिती दुपारी १२ च्या सुमारास जवळच्या वसाहतीत राहणारे मनसेचे पदाधिकारी सचिन जांभळे यांना मिळाली. जांभळे यांनी आपले सहकारी अमित दास, इरफान बिनदिनीफ यांच्यासह जंगलाकडे धाव घेतली. ही आग सकाळी १० पासून लागल्याचे त्यांना कळले. जांभळे यांनी याबाबत वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९०६ वर अनेकवेळा संपर्क करूनही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी अग्निशमन दलाच्या १०१ क्रमांकावर संपर्क केला असता जंगलातील आग विझवायला आमच्याकडे यंत्रणा नसल्याचे सांगत त्यांना मीरा-भार्इंदर महापालिकेच्या सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्राशी संपर्क करा, असे सांगण्यात आले. सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्रातूनही कुणी फिरकले नाही.
जांभळे व सहकाऱ्यांनीच आग वाढू नये, म्हणून प्रयत्न केले. पण, सुका पालापाचोळा व वाºयामुळे आग वेगाने पसरत चालली होती. काशिगाव येथील वनविभागाच्या कार्यालयात मदतीसाठी धाव घेतली असता तेथे टाळे लागले होते.
वनअधिकारी सोनावणे, पवार आदींचा संपर्कच होत नव्हता. सकाळपासून आगीने मोठ्या प्रमाणात जंगल भस्मसात केले असून सायंकाळ झाली, तरी आग पसरत चालली होती. आगीमुळे वन्यजीव सैरावैरा पळत सुटल्याचे तसेच अनेक जीव आगीत भस्मसात झाल्याचे जांभळे यांनी सांगितले.
दरम्यान, सिल्व्हर पार्क अग्निशमन केंद्रात विचारणा केली असता आधी आमची हद्द नाही, वनविभागाचे काम आहे, अशी कारणे सांगण्यात आली.

भूमाफियांनी उभारलेल्या झोपड्यांवर कारवाई नाही
राकेश आंब्रे व जवानांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण, आग मोठी असल्याने काही वेळातच जवान माघारी फिरले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या परिसरातील जंगलास आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत. या भागात भूमाफियांनी झोपड्या उभारल्या असून वनविभाग आणि महापालिका कारवाईच करत नाही. आणखी झोपड्या उभारण्यासाठी आगी लावून जंगल नष्ट करण्याचे षड्यंत्र असल्याचा आरोप मनसेचे सचिन जांभळे यांनी केला आहे.

Web Title:  Sanjay Gandhi burnt in forest; Forest officer did not turn up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे