ठाण्यात आता रोबोट करणार वाहतूकीच्या नियमांची जनजागृती

By जितेंद्र कालेकर | Published: January 14, 2019 10:26 PM2019-01-14T22:26:28+5:302019-01-14T22:33:32+5:30

ठाणे शहरात एका यांत्रिक रोबोटद्वारे वाहतूक नियमनाचे धडे ठाणेकरांना मिळणार आहे. सोमवारी तीन हात नाका येथे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या हस्ते या रोबोटचे अनौपचारिक उद्घघाटन झाले आहे.

Robot will do Public awareness of traffic rules in Thane | ठाण्यात आता रोबोट करणार वाहतूकीच्या नियमांची जनजागृती

ठाणे पोलिसांची अभिनव संकल्पना

Next
ठळक मुद्दे ठाणे पोलिसांची अभिनव संकल्पना एका खासगी कपनीच्या मार्फतीने निर्मिती २२ जानेवारीपासून पोलिसांच्या सेवेत होणार दाखल

ठाणे: ठाण्यातील एका खासगी कपनीच्या मार्फतीने निर्मिती केलेल्या यात्रिक रोबोटमार्फतठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस आता वाहतूक नियमांची जनजागृती करणार आहेत. येत्या २२ जानेवारी पासून हा रोबोट वेगवेगळया ठिकाणी वाहतूक पोलिसांसमवेत पहायला मिळणार आहे. मुलांमध्ये वाहतूकीच्या नियमांची जागृती होण्यासाठी वेगळया प्रकारे हा उपक्रम राबविण्याची संकल्पना असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.
एखादी बाब वेगळया प्रकारे मुलांमध्ये किंवा जेष्ठांमध्ये रुजविली तर ती चांगल्या प्रकारे लक्षात राहते. यासाठी वेगळी कल्पना घेऊन साकारण्यात आलेल्या या यांत्रिक रोबोटमध्ये दोन स्पीकर, डिस्प्ले दिलेले आहेत. शाळा, महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांसह मॉलमध्येही तो ठेवण्यात येणार आहे. याठिकाणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसह वाहन परवानाधारक चालकांना तो वाहतूकीचे नियम आपल्या खास शैलीमध्ये सांणार आहे. हे नियम पाळल्यामुळे आपला जीव कसा वाचू शकतो, हे तो सांगणार आहे. यामध्ये हेल्मेट परिधान करण्यापासून ते कार चालकांना सीट बेल्ट लावण्याचे धडेही तो देणार आहे. शिवाय, मुलांना झेब्रा क्रॉसिंगचे महत्व पटवून देण्याबरोबर वाहतूक चिन्हांचीही तो ओळख करुन देणार आहे. त्यामुळे ठाण्याच्या ब्रम्हांड येथील वैद्य यांच्याकडे निर्मिती झालेल्या या अनोख्या राबोटची वाहतूक पोलिसांना चांगलीच मदत होणार असल्याचा विश्वास उपायुक्त काळे यांनी व्यक्त केला आहे. सोमवारी तीन हात नाका येथे या रोबोटचे लाँचिंग करण्यात आले आहे. मात्र, त्यात पोलिसांना अपेक्षित काही दुरुस्त्या बाकी असल्यामुळे तो २२ जानेवारीपासून ख-या अर्थाने पोलिसांच्या सेवेत रुजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
.......................

Web Title: Robot will do Public awareness of traffic rules in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.