रिक्षाचालकाचा प्रवाशावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2018 10:32 PM2018-04-20T22:32:33+5:302018-04-20T22:32:33+5:30

रिक्षाचालकाने प्रवाशांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली.

rickshaw driver attack on Passenger | रिक्षाचालकाचा प्रवाशावर प्राणघातक हल्ला

रिक्षाचालकाचा प्रवाशावर प्राणघातक हल्ला

Next

अंबरनाथ - रिक्षाचालकाने प्रवाशांवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडलीय. बुधवारी रात्री उशिरा अंबरनाथच्या पूर्वे रिक्षा स्टँड हुन दिवाकर, हरिराम पासवान आणि महेश हे तीन जण एमआयडीसी परिसरात जाण्यासाठी ऑटो रिक्षा मध्ये बसले. यावेळी ६० रुपयाने भाडे  संतोष मिसाळ या रिक्षाचालकाने त्यांना सांगितले .एमआयडीसी परिसरात पोहोचल्यानंतर हरिराम याने रिक्षा चालक संतोष याला शंभर रुपयाची नोट दिली. मात्र संतोष याने ठरल्याप्रमाणे६० रुपये भाडे घ्यायचं सोडून १०० रुपये आपल्या खिशात ठेवून दिले .मात्र हरिराम यांनी संतोषकडे उरलेले ४० रुपये परत मागितल्यावर दोघांमध्ये हाणामारी झाली.यावेळी रिक्षा चालक दिपककुमार पाल,आणि चंद्रकांत हे दोघे संतोष च्या मदतीला आले आणि त्यांनी सर्वच तिन्ही प्रवाशांना मारहाण करायला सुरुवात केली.यावेळी संतोष मिसाळ या रिक्षाचालकाने शेजारील दुकानातुन चाकू आणत हरिरामच्या छातीवर आणि पोटावर वार केले.या हल्ल्यात हरिराम गंभीर जखमी झाला असून त्याला कळव्याच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हरिराम हा आयसीयूमध्ये असून प्रकृती चिंताजनक आहे . दरम्यान या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात रिक्षा चालक संतोष मिसाळ, दिपककुमार पाल आणि चंद्रकांत सोनवणे या तीन रिक्षाचालकांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलीये.त्यांना न्यायालयात हजर केले असता  २३ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.दरम्यान रिक्षा चालकांच्या  मुजोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून आता तर प्रवाशांवर हल्ला करण्याइतपत त्याची मजल गेल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होतंय.

Web Title: rickshaw driver attack on Passenger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.