अंबरनाथच्या बारवीतून ३०५ क्सेसक पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 06:26 PM2018-08-18T18:26:36+5:302018-08-18T18:31:02+5:30

रात्रभर सुरू बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत १०१.७६ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. धरणातील ६८.७८ मीटर पाण्याची पातळीत वाढली आहे. धरणात आतापर्यंत सरासरी दोन हजार १०५ मिमी पाऊस पडलेला आहे. शनिवारी धरण क्षेत्रात २१ मिमी .सरासरी पाऊस झाला.

Restoration of 305 Xsquac water in Ambernath Barve | अंबरनाथच्या बारवीतून ३०५ क्सेसक पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू

रात्रभर सुरू बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत १०१.७६ टक्के पाणी साठा तयार झाला

Next
ठळक मुद्देपावसाच्या श्रावण सरींचा जोर वाढल्यामुळे बारवी धरणातील पाणी साठ्यात १०० टक्के वाढधरणातील ६८.७८ मीटर पाण्याची पातळीओसंडून वाहणारे पाणी सुमारे १५ दिवसांपासून बंद होते३०५.१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणाच्या दरवाज्यातून पुन्हा


ठाणे : जिल्ह्यातील  शहरांसह औद्योगिक क्षेत्रातील कारखाने व कंपन्यांना पाणी पुरवठा करणारे अंबरनाथच्या बारवी धरण सुमारे महिन्यांपूर्वीच भरले होते. पण मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. यामुळे ओसंडून वाहणारे पाणी सुमारे १५ दिवसांपासून बंद होते. पण रात्रीपासून जिल्ह्यासह या धरण क्षेत्रात पावसाच्या श्रावण सरींचा जोर वाढल्यामुळे बारवी धरणातील पाणी साठ्यात १०० टक्के वाढ झाली. उर्वरित ३०५.१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग या धरणाच्या दरवाज्यातून पुन्हा ओसंडून वाहू लागला आहे.
रात्रभर सुरू बारवी धरण क्षेत्रात आतापर्यंत १०१.७६ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. धरणातील ६८.७८ मीटर पाण्याची पातळीत वाढली आहे. धरणात आतापर्यंत सरासरी दोन हजार १०५ मिमी पाऊस पडलेला आहे. शनिवारी धरण क्षेत्रात २१ मिमी .सरासरी पाऊस झाला. यातील ठाकूरवाडीत २० मिमी,कान्होळला १४ मिमी, खानिवरेला ३२ आणि पाटगांवला १६ मिमी पाऊस पडल्याची नोंद बारवी धरण व्यवस्थापन प्रशासनाने घेतली आहे.
बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाने जोर पकडला. शनिवारी दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या दरम्यान सकाळी शहापूर तालुक्यातील धुपारवाडी येथे शॉकसर्किटमुळे एकाच राहते घर जळाले. तर बारवी धरणातील बंद झालेला पाण्याचा विसर्ग या सततच्या रिपरिपमुळे पुन्हा सुरू झाला.
जिल्ह्यात ९०.४० मिमी पाऊस पडला. या दरम्यान शहापूरच्या धुपारवाडीतील दुर्घना वगळता कोठेही अनुचित घटना घडली नाही. ठाणे शहरात या पावसा दरम्यान वेगवेगळ्या ११ घटना घडल्या. यामध्ये चार वृक्ष उन्मळून पडली. तर तीन झाडे धोकादायक स्थितीत आहेत. या व्यतिरिक्त अन्यत्र कोठेही अनुचित घटना नसल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने स्पष्ट केले. जिल्हह्हयात आतापर्यंत दोन हजार १९९ मिमी सरासरी पाऊस पडला. यात आज केवळ ९०.४० मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस शहापूर तालुक्यात ३० मिमी पाऊस पडला. तर सर्वात कमी मुरबाडला केवळ २ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली.

Web Title: Restoration of 305 Xsquac water in Ambernath Barve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.