‘क्लस्टर गो बॅक’चा ठराव एकमुखाने मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 03:08 AM2018-06-20T03:08:31+5:302018-06-20T03:08:31+5:30

काही दिवसांपासून क्लस्टरच्या बाबत सुरू असलेला विरोध अद्यापही मावळलेला नाही. ठाणे मतदाता जागरण अभियानाने क्लस्टरविरोधात एक परिषद नुकतीच आयोजित केली होती.

The resolution of 'cluster go back' is given in one go | ‘क्लस्टर गो बॅक’चा ठराव एकमुखाने मंजूर

‘क्लस्टर गो बॅक’चा ठराव एकमुखाने मंजूर

ठाणे : काही दिवसांपासून क्लस्टरच्या बाबत सुरू असलेला विरोध अद्यापही मावळलेला नाही. ठाणे मतदाता जागरण अभियानाने क्लस्टरविरोधात एक परिषद नुकतीच आयोजित केली होती. या परिषदेत क्लस्टर गो बॅकचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.
उन्मेश बागवे यांनी हा ठराव मांडला तर त्याला डॉ. चेतना दीक्षित यांनी अनुमोदन दिले. या ठरावात शहरात ठाणे महापालिकेने, महाराष्ट शासनाच्या २०१७ च्या नोटिफिकेशनद्वारे जी समूह विकास योजना (क्लस्टर) राबविण्याचे २६ एप्रिल २०१८ रोजी जाहिरात प्रकाशित करून जाहिर केले आहे. या जाहिरातीत ठाणे शहराचे ४४ झोन करून, याबाबतचे नकाशे तयार केले आहेत. या व्यतिरिक्त प्रत्येक झोनमध्ये काय केले जाणार याची तपशीलवार माहिती देण्यात आलेली नाही. ती मराठी भाषेत देण्यात यावी. नोटिफिकेशननुसार मालकी हक्क बदलला जाणार असून त्याचे कोणतेही तपशील उपलब्ध नाहीत, ते देण्यात यावेत, गावठाण व कोळीवाडे यांचे सीमांकन करून, १९८२ नंतर मूळ घरांच्या रचनेत मालकीच्या जागेवर वाढवलेली घरे प्रापर्टी कार्डवर घ्यावीत, मूळ नोटिफिकेशन व यापुढील सर्व माहिती मराठीत देण्यात यावी, ठाणेकर नागरिकांनी हजारोच्या संख्येने ज्या हरकती नोंदवलेल्या आहेत. त्या सर्व हरकतींची सुनावणी घेण्यात यावी व नागरिकांनी मागितलेली सर्व माहिती देण्यात यावी, झोपडपट्टी विकासासाठीच्या विद्यमान योजना सुरू राहणार की नाही, याबाबत गोंधळाची स्थिती आहे ती ताबडतोब खुलासा करून महापालिकेने दूर करावी. जो तपशील मिळतो आहे त्यावरून सध्याची क्लस्टर योजना ही बिल्डर केंद्रीत आहे वास्तविक ती जनता केंद्रीत असायला हवी म्हणून ती रद्द करावी व जनतेशी चर्चा करून नवीन योजना आणावी. तसेच येणाऱ्या महासभेत सर्व नगरसेवकांनी या योजनेस विरोध करावा, असे आवाहन करण्यात आले.
>विरोध करण्याची मागणी
सध्याची क्लस्टर योजना ही बिल्डर केंद्रीत आहे वास्तविक ती जनता केंद्रीत असायला हवी म्हणून ती रद्द करावी व जनतेशी चर्चा करून नवीन योजना आणावी. तसेच आगमी महासभेत सर्व नगरसेवकांनी या योजनेस विरोध करावा, असे आवाहन करण्यात आले.

Web Title: The resolution of 'cluster go back' is given in one go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.