चार तास शिजवल्यावरही तरी तांदूळ शिजला नाही, तांदूळ प्लॅस्टिकचा असल्याच्या संशयाने अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2017 07:37 PM2017-09-28T19:37:10+5:302017-09-28T20:12:30+5:30

ठाकूर्ली येथील चेाळे गावात राहणारे बाळा शेट्टी यांनी एका दुकानातून तांदूळ विकत घेतले. ते तांदूळ त्यांनी कुकरमध्ये चार तास शिजत ठेवून देखील ते शिजलेच नाही. त्यामुळे तांदूळ प्लॅस्टीकचे असल्याचा संशय शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी शेट्टी यांनी अन्न व औधष प्रशासनाच्या ठाणो कार्यालयात तक्रार केली आहे.

Reported to the Food Department Department officials, suspected of having rice technology, even after four hours of cooking | चार तास शिजवल्यावरही तरी तांदूळ शिजला नाही, तांदूळ प्लॅस्टिकचा असल्याच्या संशयाने अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार

चार तास शिजवल्यावरही तरी तांदूळ शिजला नाही, तांदूळ प्लॅस्टिकचा असल्याच्या संशयाने अन्न औषध विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार

Next

 कल्याण - ठाकूर्ली येथील चेाळे गावात राहणारे बाळा शेट्टी यांनी एका दुकानातून तांदूळ विकत घेतले. ते तांदूळ त्यांनी कुकरमध्ये चार तास शिजत ठेवून देखील ते शिजलेच नाही. त्यामुळे तांदूळ प्लॅस्टीकचे असल्याचा संशय शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी शेट्टी यांनी अन्न व औधष प्रशासनाच्या ठाणो कार्यालयात तक्रार केली आहे. अधिकारी वगाने तांदळाचा नमून घेण्यासाठी शेट्टी यांच्या घरी येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. न शिजलेले तांदूळ हे प्लॅस्टीकचे आहेत की नाही हे प्रयोग शाळेत तपासणी पश्चात स्पष्ट होणार आहे. 

शेट्टी यांनी काल एक किलो तांदूळ नेतिवली येथील अमित स्टोअरमधून विकत घेतले. तांदळाचे बिल त्यांनी दुकानदाराकडून घेतले. त्यांनी विकत घेतलेला तांदूळ हा ब्रॅण्डेड नसला तरी दुकानदाराने दिलेल्या बिलावर सूरती कोलम असा उल्लेख आहे. विकत घेतलेला तांदूळ त्यांच्या घरी आज देवीची पूजा होती. त्यानिमित्त त्यांना प्रसाद तयार करायचा होता. त्यांनी तांदूळ, तूप आणि गूळ घालून त्यात थोडे पाणी टाकले. तो कुकरमध्ये शिजत ठेवला. चार तास झाले तरी हा तांदूळ शिजत नसल्याची बाब उघड झाली. त्यांचे पूजारी शेट्टी यांच्यावर गरम झाले. प्रसाद तयार नसल्याने पूजाही पार पडली नाही. न शिजलेला तांदूळ हा प्लॅस्टीकचा असू शकतो असा संशय शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. 
न शिजलेल्या तांदळा प्रकरणी त्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या ठाणो कार्यालयातील अधिका:यांशी फोनवर संपर्क साधला. तेव्हा अधिका:यांनी ठाणो कार्यालयात येऊन तक्रार द्यावी लागेल असे सांगितले. त्यानंतर प्रत्यक्ष भेट देऊन तांदूळ घेऊन जाऊन. त्याची तपासणी करुन त्यानंतर तो तांदूळ प्लॅस्टीकचा आहे की नाही हे स्पष्ट होईल.  तत्पूर्वी तांदूळ पाण्यात टाकून पहा. तो पाण्याच्या तळाशी गेला तर तो तांदूळ नाही असे समजा असेही अधिका:यानी शेट्टी यांना सांगितले. त्या प्रकारे शेट्टी यांनी ते करुन पाहिले. तेव्हा तांदूळ पाण्याच्या तळाशी गेला. तांदूळ घरी ठेवा. त्याचे नमुने घेतले जातील असे आश्वासन अधिकारी वर्गाकडून देण्यात आले आहे. यापूर्वी डोंबिवलीत प्लॅस्टीकची अंडी विकल्याची बाब समोर आली होती. मात्र तपासाअंती ती अंडी प्लॅस्टीकची नसल्याचे उघड झाले होते. त्यामुळे प्लॅस्टीकचे तांदूळ बाजारात विकले जात असल्याच्या बातम्या ऐकिवात असून प्लॅस्टीक तांदळाचा वापर चायनीज कॉर्नरमध्ये सर्रासपणो केला जातो असे ही सांगितले जाते. प्लॅस्टीक तांदळाच्या संशयाने कल्याणमध्ये खळबळ माजली आहे. संबंधित दुकानदाराकडे त्याची तक्रार का केली नाही असा सवाल शेट्टी यांच्याकडे उपस्थीत केला असता त्यांनी सांगितले की, तो अलर्ट होऊन त्याच्या दुकानातील प्लॅस्टीक तांदळाचा साठा रातोरात्र गायब करुन नामानिराळा होऊ शकतो. त्यामुळे त्याच्याकडे तक्रार करणो उचित नाही.

Web Title: Reported to the Food Department Department officials, suspected of having rice technology, even after four hours of cooking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :foodअन्न