पोलीस ठाण्यातच नोंदवा पोलिसांबद्दलचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 02:05 AM2018-03-20T02:05:36+5:302018-03-20T02:05:36+5:30

पोलीस ठाण्यात येताना आपली माहिती नोंदवतानाच परतताना काम झाल्याची माहिती किंवा आलेला अनुभव नागरिकांना पोलीस ठाण्यातच नोंदवता येणार आहे. तशी सुविधा असलेला जिल्हयातील पहिला सुविधा कक्ष भार्इंदर पोलीस ठाण्यात सोमवारी सुरु झाला.

 Report in Police Station | पोलीस ठाण्यातच नोंदवा पोलिसांबद्दलचा अनुभव

पोलीस ठाण्यातच नोंदवा पोलिसांबद्दलचा अनुभव

Next

मीरा रोड : पोलीस ठाण्यात येताना आपली माहिती नोंदवतानाच परतताना काम झाल्याची माहिती किंवा आलेला अनुभव नागरिकांना पोलीस ठाण्यातच नोंदवता येणार आहे. तशी सुविधा असलेला जिल्हयातील पहिला सुविधा कक्ष भार्इंदर पोलीस ठाण्यात सोमवारी सुरु झाला. कोकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज यांनी त्याचे उद्घाटन केले. सर्वच पोलीस ठाण्यात असे प्रतिसाद कक्ष सुरु केले जाणार आहेत.
सरकारच्या ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्य पोलिसांनीही अभ्यागत प्रतिसाद कक्ष प्रणाली सुरु केली आहे. त्यात संगणक, वेब कॅमेरा, प्रिंटर व स्कॅनर अशी यंत्रणा असेल. संगणक थेट लॅन प्रणालीने पोलीस मुख्यालयाला जोडलेला असेल. आॅफिसव्हिजिट डॉट ईन नावाच्या या प्रणालीत पोलीस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येक नागरिकास नोंद करावी लागेल. तेथे नियुक्त असलेल्या पोलीस कर्मचाºयाला तुमचे नाव, पत्ता, मोबाईल, कोणाला भेटायचे आहे? कामाचे स्वरुप काय? आदी सर्व माहिती सांगावी लागेल. तिची संगणक प्रणालीत नोंद होईल.
ती सांगणाºया व्यक्तीचा फोटो वेब कॅमने काढला जाईल. तसेच एखादे ओळखपत्र स्कॅन करुन त्यात सेव्ह केले जाईल. ही प्रक्रिया पूर्ण झाली, की त्याचा मेसेज संबधिताच्या मोबईलवर येईल. काम झाल्यावर बाहेर पडताना वेळेची नोंद करण्यासह तुम्ही ज्या कामासाठी आला होता, ते काम झाले का? पोलिसांची वागणूक कशी होती? आदींबद्दल तुमचे जे म्हणणे असेल ते नोंदवता येईल. ही अपलोड केलेली माहिती आॅनलाईन सेव्हे होत असल्याने पोलीस मुख्यालयापर्यंतचे वरिष्ठ अधिकारी ती पाहू शकतील. नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ शकतील. भार्इंदर पोलीस ठाण्यापाठोपाठ शहरातील तसेच ठाणे ग्रामीण हद्दीतील अन्य सर्वच पोलीस ठाण्यात असे स्वागत कक्ष सुरु केले जाणार आहेत. हे कक्ष २४ तास सुरु राहतील.
भार्इंदर पोलिसांनी यासाठी पाच प्रशिक्षित पोलीस कर्मचारी नेमले आहेत. यापुढे इतर पोलिसांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे.
या वेळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील, अप्पर अधीक्षक प्रशांत कदम, सहाय्यक अधीक्षक अतुल कुलकर्णी, भार्इंदर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र कांबळे उपस्थित होते.

एलपीआर कॅमेरे काढणार वाहनांच्या नंबर प्लेटचे फोटो
शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासह आरोपींना पकडण्यासाठी, गुन्ह्यांची उकल होण्यासाठी भार्इंदर पोलिसांनी लोकसहभागातून शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याचे उद्घाटनही बजाज यांच्या हस्ते करण्यात आले.
असे २३ कॅमेरे लावायचे असून सध्या प्रमुख उड्डाणपुल-गोल्डन नेस्ट तसेच भार्इंदर रेल्वे स्थानकाबाहेर प्रत्येकी चार याप्रमाणे आठ कॅमेरे लावले आहेत. सुभाषचंद्र बोस मैदान जंक्शन येथे सुध्दा कॅमेरे लावले जाणार आहेत. या तीन प्रमुख ठिकाणी एलपीआर कॅमेरे बसवले जाणार आहेत. भरधाव वाहनांच्या नंबर प्लेटचे छायाचित्र काढले जाऊन ते डाटामध्ये स्टोर होईल.

पोलीस ठाण्यातील गप्पांचीही नोंद
प्रत्येक पोलीस ठाण्यात माईकसह सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. पोलीस अधिकाºयांना त्यांच्या मोबाईलवर पोलीस ठाण्यात काय चालले आहे दिसेलच. शिवाय कोण काय बोलतेय तेही ऐकू येईल. बजाज यांनी त्या यंत्रणेचीही चाचणी घेतली.

सीसीटीव्हीने
काम सोपे
पोलीस ठाण्याच्या हद्दीचा गुगल नकाशा स्टोअर केलेला आहे. गुन्ह्याची माहिती कळताच त्याच्या ठिकाणावरुन तेथील रस्ते, सीसीटीव्ही आदी माहितीचा वापर पोलीस करू शकतील. सीसीटीव्हीमुळे गुन्ह्यांच्या तपासाचे ९० टक्के काम सोपे होत असल्याचे बजाज म्हणाले.

पासपोर्टसाठी येणाºया नागरिकांच्या प्रतिक्रिया वरिष्ठ अधिकाºयांनी जाणून घेतल्या असून त्याचा डाटा तयार केला आहे. त्यात पोलीस पैसे मागत असल्याची कल्याण तालुक्यातील एकमेव तक्रार आहे.
केंद्र सरकारच्या निधीतून सुमारे ४०० कोटींची एकाच नियंत्रण कक्षाची योजना आहे. ती अंमलात आल्यास १०० क्रमांकाची तक्रार दूर होईल, असे ते म्हणाले.

Web Title:  Report in Police Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.