राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी राज्यभर साजरी होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 03:59 PM2018-01-21T15:59:37+5:302018-01-21T15:59:59+5:30

मराठीतील शेक्सपिअर भाषाप्रभु राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष 23 जानेवारी 2018 पासून सुरु होत आहे. या शताब्दी वर्षानिमित्त सीकेपी संस्थेने वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आखून स्मृतिशताब्दी वर्ष साजरे करण्याचे जाहीर केले आहेत.

Ram Ganesh Gadkari will be celebrated throughout the state of Maharashtra | राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी राज्यभर साजरी होणार

राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी राज्यभर साजरी होणार

googlenewsNext

कल्याण - मराठीतील शेक्सपिअर भाषाप्रभु राम गणेश गडकरी यांचे स्मृतिशताब्दी वर्ष 23 जानेवारी 2018 पासून सुरु होत आहे. या शताब्दी वर्षानिमित्त सीकेपी संस्थेने वर्षभर संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रम आखून स्मृतिशताब्दी वर्ष साजरे करण्याचे जाहीर केले आहेत. या स्मृतिशताब्ब्दी वर्षाचा प्रारंभ पुण्यातुन होणार असून 23 जानेवारी रोजी कल्याण शहरात दणकेबाज कार्यक्रम होणार आहे.

राम गणेश गडकरी यांचे शिक्षण व लेखन पुण्यातच झाले असल्याने स्मृतिशताब्दीचा प्रारंभ 22 जानेवारी 2018 रोजी स्मृतिशताब्दीच्या पूर्वसंध्येला होणार आहे. 22 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरानजिक स्मृतिशताब्दीचा प्रारंभ होणार आहे. यासमयी पुण्यातील सीकेपी संस्थेचे कार्यकर्ते व गडकरी प्रेमी उपस्थित राहणार आहेत. 23 जानेवारी रोजी सकाळी राम गणेश गडकरी यांच्या जन्मस्थानी नवसारी येथे राम गणेश गडकरी यांना श्रध्दांजली वाहुन स्मृतिशताब्दी वर्षांचा शुभारंभ होणार आहे. 
कल्याणमध्ये शिवसेनाप्रमुख व गडकरींच्या स्मृतिंना उजाळा
23 जानेवारी रोजी कल्याण शहरात बालचित्रकला स्पर्धा व राम गणेश गडकरी कट्ट्याचे उद्घाटन होणार आहे. बाल चित्रकलेसाठी सुमारे 5 हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तसेच राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मदतीने राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
कल्याणच्या काळा तलाव भागात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. तेथेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिंना उजाळा देणारा कार्यक्रम होणार आहे. यासमयी कल्याणचे महापौर राजेंद्र देवळेकर यांच्याहस्ते  राम गणेश गडकरी कट्ट्याचे उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्रात प्रथमच राम गणेश गडकरी यांच्या नावाने कल्याणमध्ये कट्टा सुरु होत आहे.
कल्याणमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी दशक्रीया चित्रपटाचे कलाकार उपस्थित राहणार आहेत. सारेगमप  मध्ये प्रथम आलेला कल्याणकर नचिकेत लेले यांचा सत्कार करण्यात येणार आहे. राम गणेश गडकरी यांच्यावर डॉ. प्रा. विमुक्ता राजे बोलणार आहेत तर चित्रपट कलाकार अनुश्री फडणीस राम गणेश गडकरी यांच्या कविता वाचणार आहेत. शिवसेनाप्रमुखांचे भाचे व कलाकार पंकज गुप्ते `मी पाहिलेले बाळासाहेब' या विषयावर बोलणार आहेत. तसेच कल्याणमधील विविध क्षेत्रातील कलाकारांचा सत्कार करण्यात येणार आहे. चित्रकला स्पर्धेचा बक्षिस समारंभ व अन्य कार्यक्रम होणार आहेत.

कल्याण पाठोपाठ ठाणे, मुंबईसह राज्याच्या सर्वच  भागांमध्ये राम गणेश गडकरी स्मृतिशताब्दी वर्षाचे कार्यक्रम केले जाणार असल्याची माहिती सीकेपी संस्थेचे अध्यक्ष तुषार राजे यांनी दिली. कल्याणमध्ये सुरु होणाऱ्या राम गणेश गडकरी कट्ट्यामार्फत विविध सांस्कृतिक उपक्रम केले जाणार आहेत. कट्ट्याच्या यशस्वीतेसाठी सर्वश्री मेघन गुप्ते, पुरुषोत्तम फडणीस, नरेंद्र राजे इत्यांदी मेहनत घेत आहेत.
पुण्यातील गडकरींचा पुतळा
राम गणेश गडकरी यांच्या पुतळयाची गेल्या वर्षी 3 जानेवारी रोजी पुण्याच्या संभाजी उद्यानात विटंबना करण्यात आली. त्यानंतर पुण्याच्या महापौरांना गडकरी प्रेमींना एक नवा पुतळा दिला असून तो पुतळा उभारण्याची मागणी करणारे निवेदन पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना सीकेपी संस्थेतर्फे देण्यात आले आहे.
राम गणेश गडकरी यांचा पुतळा संभाजी उद्यानात उभारण्यास विरोध असेल तर बालगंधर्व रंगमंदिरात उभा करावा किंवा पुण्याच्या कोणत्याही भागात उभारुन स्मृतिशताब्दी वर्षात राम गणेश गडकरी यांना श्रध्दांजली वाहावी असे आवाहन सीकेपी संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Ram Ganesh Gadkari will be celebrated throughout the state of Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.