धोकादायक इमारतींवर पावसाळी वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 04:32 AM2018-05-25T04:32:42+5:302018-05-25T04:32:42+5:30

आपत्ती काळात अंधेरीहून येणार एनडीआरएफ : बचाव पथक तैनातीचे आदेश

Rainy Watch on Dangerous Buildings | धोकादायक इमारतींवर पावसाळी वॉच

धोकादायक इमारतींवर पावसाळी वॉच

Next

ठाणे : पावसाळ्यातील आपत्तीला मुंबईकरांसह ठाणेकर तोंड देण्यास समर्थ असले, तरी त्यास राष्टÑीय आपत्ती बचाव व शोध पथकाचे (एनडीआरएफ) पाठबळ आहे. यासाठी केंद्र शासनाने मुंबई व ठाणे परिसरांसाठी एनडीआरएफची तीन पथके तैनात केली आहेत. मात्र, त्यांचे वास्तव्य मुंबईच्या अंधेरी परिसरात आहे. आपत्ती काळात आवश्यकता भासल्यास ते ठाणे जिल्ह्यातील घटनास्थळी हजर होणार आहेत.
तत्पूर्वी वीजअटकाव यंत्रणेच्या दुरुस्तीसह महापालिका, नगरपालिकांना बचाव पथक तैनातीचे आदेश ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने दिले आहेत. यावेळी जिल्ह्यातील अतिधोकादायक इमारतींच्या सर्वेक्षणासह धोकादायक कारखान्यांच्या सुरक्षेची आराखड्यावर चर्चा करून वॉच ठेवण्यावर नुकत्याच झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत लक्ष केंद्रित करण्यात आले.
एनडीआरएफच्या बचाव व शोधकार्याची ठाणेकरांना उत्तम जाणीव आहे. त्यांना ठाण्यात वास्तव्य करणे शक्य व्हावे, यासाठी घोडबंदर परिसरात त्यांची निवासव्यवस्था केलेली आहे. मात्र, घोडबंदरला न राहता अंधेरी येथे पथक वास्तव्य करणार असले, तरी संकटकाळी ठाणे जिल्ह्यातील आपत्तीस्थळी ते तत्काळ हजर होणार असल्याचे सूतोवाच एनडीआरएफच्या दिल्ली येथील कार्यालयाने केले आहे. याचा ऊहापोह जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाच्या या पावसाळी सुरक्षा आढावा बैठकीत झाला.
जिल्ह्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग, पाटबंधारे, कृषी, तहसीलदार आदी कार्यालये आदी सर्व सरकारी कार्यालयांमध्ये १ जूनपासून २४ तास आपत्ती निवारण कक्ष सुरू करण्याचे आदेश या आढावा बैठकीत निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी देऊन सर्व यंत्रणांचा आढावा घेतला.
यावेळी उपस्थित असलेले एनडीआरएफचे कमांडर विजेंद्र दाहिवा यांनी संकटकाळी घटनास्थळी उपस्थित राहण्याच्या दृष्टीने आराखडा सादर केला. तर, मीरा-भार्इंदर महापालिकेच्या बचाव व शोध पथकास प्रशिक्षण देण्याचे दाहिवा यांनी मान्य केले. जिल्ह्यात ठिकठिकाणी असलेल्या वीजअटकाव यंत्रणेच्या दुरुस्तीसह पर्जन्यमापक यंत्रणेतील सुधारणा करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी या बैठकीत संबंधित अधिकाºयांना दिल्या.

मिळणार पर्जन्यमानाचा अंदाज : संभाव्य पर्जन्यमानाची माहिती हवामान खात्याचे उपमहानिर्देशक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. याशिवाय, पावसाच्या कालावधीत सतर्क राहण्याच्या दृष्टीने सर्व अधिकाºयांना तत्काळ एसएमएस व ई-मेल पाठवण्यात येणार असून त्यासाठी अधिकाºयांनी तत्काळ मोबाइल क्रमांकासह ई-मेलनोंदणीची सक्ती केली आहे. आरोग्यासाठी औषधांचा साठा, नाल्यांची साफसफाई, औद्योगिक सुरक्षा, सोशल मीडियावर अपप्रचारावरील नियंत्रणावर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व नियंत्रण कक्षाने लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: Rainy Watch on Dangerous Buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.