Public Works Department Minister Eknath Shinde is a mother-daughter-in-law | सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक
सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक

ठाणेः जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगुबाई शिंदे (७०) यांचे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ठाण्यात निधन झाले. त्यांच्या पश्चात पती संभाजी शिंदे, एकनाथ शिंदे, सुभाष शिंदे, प्रकाश शिंदे ही मुले, एक मुलगी, सुन लता शिंदे, अन्य दोन सुना, नातु विद्यमान खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, नातसून, नातवंडे असा परिवार आहे. आजारपणामुळे त्या दहा दिवसांपासून ठाण्याच्या रुग्णालयात उपचार घेत होत्या. त्या उपचारादरम्यान त्यांचे निधन झाल्याचे शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. कल्याणचे खासदार आणि उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या त्या आजी आहेत. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी वागळे इस्टेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असून, अंत्ययात्रा  शिंदे यांच्या लुईसवाडी येथील निवासस्थानाहून सकाळी 11 वाजता निघणार आहे.

 


Web Title: Public Works Department Minister Eknath Shinde is a mother-daughter-in-law
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.