Prohibition of Gadkari's remarks, Opposition protests | गडकरींच्या वक्तव्याचा डोंबिवलीत निषेध, विरोधकांची आगपाखड
गडकरींच्या वक्तव्याचा डोंबिवलीत निषेध, विरोधकांची आगपाखड

डोंबिवली  - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डोंबिवलीवर अत्यंत घाणेरडे शहर, असा शेरा मारल्यानंतर शिवसेना सदस्य असलेले महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्या वक्त व्याचा निषेध केला. भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी शहराच्या अवस्थेचे खापर पालिकेच्या प्रशासनावर फोडले आहे. गडकरींनी डोंबिवली शहराची माफी मागण्याची मागणी कल्याण जिल्हा काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक नवेंदू पाठारे यांनी केली. मनसेने मात्र शहराच्या मुख्य चौकात बॅनर लावत गडकरींचे आभार मानले आहेत. ‘डोंबिवली ही साहेबांची (उद्धव ठाकरे) सासुरवाडी आहे, निदान त्याची तरी लाज बाळगायची, अशा शब्दात मनसेने शिवसेनेला टोला लगावला आहे.
डोंबिवलीतील नववर्ष स्वागतयात्रेच्या पार्श्वभूमीवर स्वागतयात्रा संयोजन समितीने विकासाच्या राजमार्गाबाबात १५ ठिकाणी तरूणांशी नितीन गडकरी यांचा संवाद घडवला. तेथे गडकरी यांनी केलेल्या विधानाचे पडसाद राजकीय क्षेत्रासह, शहरभर उमटले असून उलटसुलट प्रतिक्रियांचा पाऊस सोशल मीडियावर पडला.
कल्याण-डोंबिवली पालिकेत सत्तेत असलेल्या भाजपाने या वक्तव्याप्रकरणी सावध भूमिका घेतली असली तरी या घाणेरड्या शहराची जबाबदारी आपल्या शिरावर पडेल, हे लक्षात येताच सत्ताधारी शिवसेनेने त्याचा खरपूस समाचार घेतला. महापौर देवळेकर यांनी हे वक्तव्य म्हणजे जबाबदारी झटकण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. ‘गडकरीसाहेब, आपण अतिशय हुशार व कार्यतत्पर आहात; पण म्हणून शहराच्या बकाल अवस्थेला डोंबिवलीच्या नागरिकांना जबाबदार धरण्याचे बेजबाबदार विधान आपण कसे करू शकता?’ असा सवाल महापौरांनी केला. १९७५ च्या आधीपासून जनसंघ आणि आता भाजपाच्या लोकप्रतिनिधींना डोंबिवलीकर नियमितपणे निवडून देतात हे विसरून आपण नागरिकांनाच दोष कसा देता? असे विधान करण्याआधी आपल्या पक्षाचे नगरसेवक, आमदार, मंत्री यांनी डोंबिवली शहरासाठी काय केले हे त्यांना खाजगीत विचारले असते तर बरे झाले असते, असे सांगत महापौरांनी भाजपाच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले. राहिला प्रश्न नागरीकांच्या जबाबदारीचा; तर अनेक नागरिकांनी आपली घरे तोडून रस्ता रूंदीकरण मोहीमेला सहकार्य केले आहे. पण तोडफोड कारवाई करणाºया ई. रवींद्रन यांच्यासारख्या आयएएस अधिकाºयाला आपल्याच मंत्र्यांनी दबावाखाली आणले व दोन वर्षे पूर्ण होण्याआधी बदलले. शहरातील विकासकामांमध्ये बाधित होणाºया भूमिपुत्रांना नागपुर समृध्दी महामार्गासारखा मोबदला- पॅकेज जाहीर करण्याच्या सूचना आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्या, तसेच जमले तर निवडणूक काळात घोषणा केलेल्या सहा हजार ५०० कोटींमधील काही तरी द्या. यातले काहीही न करता केवळ सुसंस्कृत-सुशिक्षित नगरीला आणि त्यातील नागरिकांना बोल लावू नका, अशा शब्दात महापौरांनी गडकरींचा समाचार घेतला.
शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही डोंबिवलीत सगळ््यात जास्त नगरसेवक आणि मंत्री भाजपाचे असल्याकडे लक्ष वेधले. महापालिका रस्ते रूंद करण्यासाठी प्रयत्न करते, तेव्हा नेमके कोण आडवे येते, हे काही वेगळे सांगायला नको. केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जे कान टोचले आहेत, त्यातून तरी यापुढे बदल होणार की नाही, हे नागरिकांनी ठरवावे, असा टोला शिंदे यांनी लगावला.
गडकरी यांनी डोंबिवली शहराची जी बदनामी केली आहे, त्यासाठी समस्त डोंबिवलीकरांची माफी मागावी, अशी मागणी करताना काँग्रेसचे नवेंदू पाठारे यांनी गेली अनेक वर्षे पालिकेत शिवसेना- भाजपाची सत्ता असल्याकडे लक्ष वेधले. सत्ता उपभोगूनही भाजपा नेत्यांनी असे वक्तव्य करणे लांच्छनास्पद आहे. गडकरी यांच्यासारख्या महत्वाच्या पदावर असणाºया व्यक्तीला हे शोभणारे नाही. डोंबिवली बकाल होण्यास युतीची सत्ता कारणीभूत आहे. गडकरी यांनी त्यांना कानपिचक्या देऊन काम करून घेणे आवश्यक होते, असे पाठारे म्हणाले.

काही बाजूने, तर काही विरोधात

राष्ट्रवादीचे डोंबिवली कार्याध्यक्ष राजेंद्र नांदोस्कर यांनी मात्र गडकरी यांच्या विधानाचे स्वागत केले आहे. गडकरी यांनी वस्तुस्थिती मांडली आहे. त्यांच्याच लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने बांधकामे उभी राहत असून केडीएमसीतील भ्रष्ट अधिकाºयांना अभय मिळत असल्याचा मुद्दा त्यांनी मांडला. पालिकेतील विरोधी पक्ष मनसेने तर बॅनरबाजीतून गडकरींचे आभार मानले आहेत. गेली ४१ वर्षे शिवसेना-भाजपा युतीचीच सत्ता, आमदार, खासदार युतीचेच असल्याकडे मनसेने लक्ष वेधले आहे.

फलकावर सासुरवाडीचा सूचक उल्लेख करताना त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा संदर्भ आणत त्यांच्या आडून सेनेच्या नेत्यांना टोला लगावला आहे. गडकरीसाहेब, आता तुम्हीच आमचे प्रतिनिधित्व करा, आमचा तुम्हाला मनसे पाठिंबा,’ असे सांगणारे त्यांचे बॅनर लक्षवेधी ठरले आहेत. भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस शिवाजी आव्हाड यांनी मात्र सावध भूमिका घेताना या बकालपणाचे सर्व खापर केडीएमसी प्रशासनावर फोडले आहे.

१९८३ ते ९५ या काळात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे फोफावली. आताही अधिकाºयांकडून अशा बांधकामांना अभय मिळते. मोठमोठया इमारतींवर थातुरमातुर कारवाई होते. शहर घाणेरडे होण्यास लोकप्रतिनिधी अंशत: जबाबदार आहेत, पण निष्क्रिय आणि भ्रष्ट अधिकाºयांचा कारभार या शहराच्या बकालपणाला कारणीभूत ठरल्याचे म्हणणे आव्हाड यांनी मांडले आहे. डोंबिवलीला नावे ठेवणाºया गडकरी यांनी प्रथम नागपुर सुधारावे. नंतर इतर शहरांबाबत बोलावे.

त्यांचे वक्तव्य हा एकप्रकारे डोंबिवलीकरांचा अपमान आहे. संपूर्ण देशात डोंबिवलीचा सुसंस्कृत आणि सुशिक्षितांची नगरी म्हणून नावलौकीक असताना गडकरींचे वक्तव्य हास्यास्पद असल्याचे मत आम आदमी पक्षाचे सोशल मीडियाप्रमुख दीपक दुबे यांनी व्यक्त केले. रिपब्लिकनचे डोंबिवली शहर कार्याध्यक्ष किशोर मगरे यांनी गडकरी हे केंद्रीय मंत्री असून त्यांचे विधान सत्ताधाºयांनी गंभीरपणे घेण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले.

सोशल मीडियावरील मुद्दे

च्भाजपाने २०१५ च्या पालिका निवडणुकीपूर्वी विकास परिषद घेतली. त्यातले ६५०० कुठे गेले. की ती ‘अच्छे दिन’सारखी गले ही हड्डी होती?
च्नुसते भरसमाठ आकडे सांगून विकास होत नसतो गडकरीजी. नेत्यांच्या नव्हे, लोकांच्या आयुष्यात फरक पडावा लागतो.
च्मिस्ड कॉल देऊन पक्षसदस्य वाढवता येतात. थापा मारून मते मिळवता येतात. पण विकासाचे काय? की त्यासाठीही मिस्ड कॉल द्यायचा?
च्भाजपाचे सर्वाधिक नगरसेवक डोंबिवलीतून निवडून येतात. ते या काळात काय स्वत:चाच विकास करत होते का?
च्भाजपाला मते द्या म्हणून फिरणारे संघ स्वयंसेवक आता गप्प का? ते घेणार का या घाणेरड्या शहराची जबाबदारी?
च्आता ईशान्येत जाऊन काम पुरे झाले. थोडे दिवस डोंबिवलीत पूर्णवेळ राहून कामे करा.
च्नववर्षाच्या शोभायात्रेपूर्वीच संघवाल्यांनी शोभा करून घेतली.
च्आम्हाला आजवर बकालपणा दिसलाच नाही. आमचा चष्मा पारदर्शक आहे वाटतं!
च्डोंबिवली स्वच्छ होण्यासाठी एखादा मंत्र म्हणायला हवा किंवा यज्ञ करायला हवा.
च्डोंबिवलीकरांनो, चलो नागपूर.


Web Title:  Prohibition of Gadkari's remarks, Opposition protests
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.