प्रभाग अध्यक्षपद २२ नोव्हेंबरला

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 12:47am

नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक अखेर येत्या २२ नोव्हेंबर रोजी घेण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे.

ठाणे : नऊ महिने रखडलेल्या प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक अखेर येत्या २२ नोव्हेंबर रोजी घेण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. त्यानुसार, या प्रभाग समित्यांवर शिवसेनेचे वर्चस्व राहणार असले तरीदेखील उथळसर प्रभाग समिती ताब्यात घेण्यासाठी भाजपाने मात्र मोर्चेबांधणी केली आहे. सत्ताधारी शिवसेनेला स्थायी समितीसाठी झगडावे लागत आहे. त्यामुळेच इतर समित्यांच्या निवडणुका रखडल्या होत्या. आता तब्बल नऊ महिन्यांनंतर प्रभाग समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. मागील महिन्यात महासभेत शहरातील प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली. १० प्रभाग समित्या एकने कमी करून नऊ करण्यात आल्या. त्यांची निवडणूक आता २२ नोव्हेंबरला दुपारी १ वाजता महापालिकेत घेतली जाणार आहे. मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी कुशवाह यांच्या अध्यक्षतेखाली या निवडणुका होणार आहेत. कोपरी, नौपाडा, वागळे, लोकमान्यनगर, सावरकरनगर, वर्तकनगर, माजिवडा, मानपाडा आणि दिवा, शीळ या प्रभाग समितीवर शिवसेनेचे वर्चस्व राहणार आहे. तर, कळवा, मुंब्रा या प्रभाग समित्यांमध्ये राष्टÑवादीची बाजी मारणार आहे. उथळसर प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे दोन, राष्टÑवादीचे चार आणि भाजपाचे सहा असे संख्याबळ आहे. या ठिकाणी शिवसेना, राष्टÑवादी यांची आघाडी झाली, तर भाजपाविरुद्ध शिवसेना, राष्टÑवादी असा सामना येथे रंगण्याची चिन्हे आहेत. त्यातून नवी राजकीय समीकरणे अस्तित्त्वात येतील.

संबंधित

सहा हुक्का पार्लर केले सील, ठाणे पालिकेची कारवाई
ठाणे महानगरपालिका सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचे दिवा भाजपाने घातले श्राद्ध
बारमालकाकडून आयुक्तांची बदनामी, वादग्रस्त चित्रफीत
ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : एअर इंडिया, राजमाता जिजाऊ विजेते 
नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, बाहुबलीची क्रेझ , हाताच्या बोटाएवढी फिरकी वेधतेय लक्ष

ठाणे कडून आणखी

सायबर लॅब ठेवणार सोशल मीडियावर वॉच ?
उत्सव सरले, पण होर्डिंग्ज उतरेना; केडीएमसी प्रशासनाची डोळेझाक
महापौर मॅरेथॉनला तीन वर्षे ब्रेक, केडीएमसीच्या आर्थिककोंडीचा फटका : यंदाही होणे दुरापास्तच
कल्याण-वसई जलमार्गाला चालना, खासदारांकडून पाहणी : मेट्रोच्या धर्तीवर उभारणार १० स्थानके
सेनेने ताबा घेतलेले विरोधी पक्ष नेता दालन पालिकेकडुन सील 

आणखी वाचा