आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 11:50 AM2018-06-25T11:50:38+5:302018-06-25T11:54:34+5:30

आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर रविवारी सादर झाली. 

Presenting on grandfather's acting "Ekjon" singer acting actor | आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर सादर

आजोबा नातवाच्या नात्यावर भाष्य करणारी "अज्जू" एकांकिका अभिनय कट्ट्यावर सादर

googlenewsNext
ठळक मुद्देअज्जू एकांकिकेने प्रेक्षकांची जिंकली मने आजोबा आणि नातू यांच्या नाते संबंधावर भाष्यकिरण नाकती यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते - मयेकर

ठाणे : कलाकारांतील कलागुणांना मुक्तपणे वाव देणाऱ्या अभिनय कट्यावर वेगवेगळ्या विषयांवर नाटक सादर केले जाते. रविवारी कट्टा क्रं ३८२ मध्ये सादर झालेल्या अज्जू एकांकिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आजोबा आणि नातू यांच्या नाते संबंधावर या नाटकात भाष्य केले गेले. काही झाले तरी आपल्या आजोबांना वृद्धाश्रमात जाऊ देणार नाही हा नाटकातील नातवाचा हट्ट मनाला भावून जातो.हि एकांकिका पाहण्यासाठी मुले, पालक तसेच जेष्ठ नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

       हल्लीच्या धावपळीच्या जगात प्रत्येकालाच पुढे जाण्याची घाई दिसते.पण मागे बघायला कोणालाच वेळ नाही.स्पर्धेच्या जगात टिकून राहण्यासाठी स्टॅंडर्ड  ऑफ लिव्हिंग  बदलण्याचा प्रयत्न केला जातो.मात्र या सगळ्यात नाते संबंधांकडे दुर्लक्ष केले जाते.याची जाणीव देखील शहरी भागातील बऱ्याचशा  पती पत्नींना होत नाही ही आश्चर्याची बाब आहे.घरातील वृद्ध व्यक्तीची अडचण वाटू लागणे हि आजच्या काळातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. याचा मुलांवर अप्रत्यक्षरित्या परिणाम होत असतो.मुलांचा एकटेपणा वाढण्यास सुरवात होते.आजोबा आणि नातू यांच्यात संभाषणाची दरी निर्माण होऊ शकते.या एकांकिकेचे लिखान राजन मयेकर आणि दिग्दर्शन किरण नाकती यांनी केले आहे. या एकांकिकेतील अज्जू या पात्राची घरात अडचण होऊ लागल्याने आणि त्यांचे वागणे पोरखेळ वाटू लागल्याने,आपल्या लहान मुलावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून घरातील सदस्य त्यांना घरातून निघून जाण्याचा सल्ला देतात.तुम्ही एक तर गावी जा किंवा वृद्धाश्रमात जा असे त्यांना सांगण्यात येते.कठीण काळात अज्जू ने आपल्या पत्नी सोबत खूप मेहनतीने घर बांधलेले असते.पण आता उतार वयात त्यांनाच घरातून बाहेर जाण्यास भाग पाडले जाते.मी माझ्या मुलाला शिकवलं,मोठं केलं,त्याला काहीच कमी पडू दिलं नाही.आता तो जेव्हा मोठा झाला तेव्हा त्याला मी नको स्वतःची "स्पेस" हवी आहे. असे अज्जू या पात्राचे म्हणने आहे.प्रत्येकाला एक अज्जू हवा असतो,जुन्या गोष्टी नव्याने ऐकण्यासाठी.मैत्रीसाठी,खेळ खेळण्यासाठी,कधी रागावन्यासाठी तर कधी भांडन्यासाठी,मैत्रीला कोणतं वय नसतं असं अज्जू एकांकिकेतील नातवाचं म्हणन आहे. एकत्र कुटुंब पद्धतीचा झालेला ह्रास आणि विभक्त कुटुंब पद्धतीची उडालेली बोंब आपल्याला या नाटकातून प्रकर्षाने जाणवते.वाढती महागाई,स्पर्धा या सगळ्या गोष्टीत गणिती आयुष्य जगले जात आहे.या जगण्यात माणूस म्हणून दोन शब्द बोलायला कोणालाच वेळ मिळत नाही. नुकतेच आजारपणातुन सावरलेले अभिनय कट्ट्याचे कलाकार आणि या नाटकाचे लेखक राजन मयेकर यांनी आयुष्याला पुन्हा नव्याने सुरवात केली आहे.आपलं आजारपण विसरून त्यांनी पुन्हा रंगमंचावर रमायचे ठरवले आहे.इंटर कॉलेज स्पर्धा,इंटर बँक स्पर्धा,राज्यनाट्य स्पर्धा पासून मालिका क्षेत्र गाजवणारे मयेकर नाटक करताना खूप समाधान मिळते असं म्हणतात.अभिनय कट्ट्यावर काम करताना कलाकार म्हणून खूप ऊर्जा मिळते. आयोजक किरण नाकती यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभते असे मयेकर यांनी सांगितले. या एकांकिकेतील नातवाप्रमाणे आपण व आपल्या घरातील सदस्यांनी आपल्या "अज्जू"ला कधीच वृद्धाश्रमात पाठवू नका असे आव्हान अभिनय कट्ट्याचे आयोजक किरण नाकती यांनी केले. तसेच या प्रसंगी सहदेव कोळमकर,सई भगत, शिल्पा लाडवंते आणि सहदेव साळकर यांनी एकपात्री सादर करत प्रेक्षकांची मने जिंकली. कट्ट्याचे निवेदन आरती ताथवडकर हिने केले.या एकांकिकेत राजन मयेकर,अद्व्यत मापगावकार,कुंदन भोसले,शिवानी देशमुख यांनी काम केले.प्रकाशयोजना परेश दळवी,संगीत सहदेव साळकर,रंगभूषा दीपक लाडेकर तसेच,नेपथ्य व रंगमंचव्यवस्था वैभव चौधरी-प्रतीक हिवरकर यांनी पार पाडली

Web Title: Presenting on grandfather's acting "Ekjon" singer acting actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.