खड्डे बुजविण्याचे पालकमंत्र्यांचे तंत्रज्ञानही ठरतेय कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 03:43 PM2018-08-15T15:43:56+5:302018-08-15T15:46:05+5:30

खड्डे बुजविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेन कॉंक्रीट हे नवीन तंत्रज्ञान वापरावे असा सल्ला दिला होता. परंतु आता तेच तंत्रज्ञान फेल ठरल्याचे स्पष्ट होत आहे. ज्या पुलावर हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते, त्याठिकाणी आजच्या घडीला खड्डेच खड्डे पडले आहेत.

Practical policymakers are ready to revive the potholes | खड्डे बुजविण्याचे पालकमंत्र्यांचे तंत्रज्ञानही ठरतेय कुचकामी

खड्डे बुजविण्याचे पालकमंत्र्यांचे तंत्रज्ञानही ठरतेय कुचकामी

Next
ठळक मुद्देमहापालिकेने ५० टन रेंन कॉंक्रीट खरेदी केलेत्या पुलावर खड्डेच खड्डे

ठाणे - रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे हे दोन वेळा रस्त्यावर उतरले होते. तसेच त्यांच्याच मार्गदर्शनाखाली कापुरबावडी उड्डाणपुलावरील खड्डे सुध्दा रेन कॉंक्रीट या नव्या तंत्रज्ञानातून बुजविण्यात आले होते. परंतु अगदी काही दिवसातच हे तंत्रज्ञान फेल्याचे स्पष्ट झाले आहे. आजच्या घडीला या पुलावर ५० हून अधिक खड्डे असून तात्पुरत्या स्वरुपात लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉकही उखडले आहेत.
            पावसाळ्यात बुजविलेले खड्डे पुन्हा उखडू नयेत म्हणून पालिकेने मागील महिना भरात विविध स्वरुपाच्या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेने मुंब्रा भागात अ‍ॅक्वा पॅच या नवीन तंत्रज्ञानाच्या साहाय्याने खड्डे बुजविले होते. तर कोपरी पुल येथे रेनकॉनच्या साहाय्याने आणि कॅसल मील परिसरात पॉलिमर सिरॅमिक काँक्र ीटच्या साहाय्याने खड्डे बुजविले होते. त्यापाठोपाठ कापुरबावडी उड्डाणपुलावर पॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करून बुजविण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्यावर अत्याधुनिक स्वरुपाच्या ओळखल्या जाणाऱ्या रेन कॉंक्रीट या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. यावेळी दस्तुरखुद्द पालकमंत्री त्या उड्डाणपुलावर हजर होते आणि हे तंत्रज्ञान उत्तम असल्याची पावती सुध्दा त्यांनी दिली होती. त्यानंतर उर्वरीत महापालिका आणि नगरपालिकांनीसुध्दा या तंत्रज्ञानाचा वापर करावा असेही आदेश त्यांनी संबधीत महापालिकांना दिले होते.
त्यानुसार ठाणे महापालिकेने ५० टन रेन कॉंक्रीट मागविले आहे. हे कॉंक्रीट इतर कॉंक्रीटपेक्षा महाग सुध्दा आहे. दरम्यान पालकमंत्र्यांनी ज्या ठिकाणचे खड्डे बुजविले होते. त्याच उड्डाणपुलावर आजच्या घडीला ५० हून अधिक खड्डे पडले असून वाहनांचा वेग पुर्ता मंदावला आहे. काही खड्डे इतके मोठे झाले आहेत, की खालील रस्त्याचा तळही दिसू लागला आहे. काही ठिकाणी लावण्यात आलेले पेव्हरब्लॉकही उखडले आहेत. त्यामुळे हे तंत्रज्ञान आता कितपत किफायतशीर आहे, याची माहिती समस्त ठाणेकरांना झालीच आहे. परंतु हे तंत्रज्ञान वापरण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवालही या निमित्ताने आता उपस्थित झाला आहे.



 

Web Title: Practical policymakers are ready to revive the potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.