‘पाणीकपातीला सत्ताधारीच जबाबदार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2018 05:42 AM2018-11-17T05:42:05+5:302018-11-17T05:42:23+5:30

सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान २५० एमएलडी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे.

 'Powerful responsible for water sharing' | ‘पाणीकपातीला सत्ताधारीच जबाबदार’

‘पाणीकपातीला सत्ताधारीच जबाबदार’

googlenewsNext

मीरा रोड : पाणीकपात लागू होण्यास सत्ताधारीच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी केला आहे.
शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्याचे ठिकाण ४० ते ४५ किलोमीटरवर असल्याने दोन वेळच्या पाणीपुरवठ्यातील अंतर ४० तास इतके आहे.

सध्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किमान २५० एमएलडी पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. परंतु, शहराला सध्या १७६ एमएलडी पाणीपुरवठा होत आहे. यंदा धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्याने शहरात १४ टक्के पाणीकपात लागू केली आहे. नागरिकांना तासभरही पाणी पुरत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. सूर्या प्रकल्पाचे काम सुरू झालेले नाही. म्हाडाने मुंबई पालिकेकडून पाच एमएलडी पाणीपुरवठा शहराला उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पाळलेले नाही. ते पाणी मिळवण्यासाठी सत्ताधाºयांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्याच्या अपुºया पाणीपुरवठ्याला पाणीकपातीचे ग्रहण लागले असताना ते ग्रहण सोडवण्यासाठी भाजपा कोणतीही पावले उचलत नाही असा आरोप सावंत यांनी केला आहे.
 

Web Title:  'Powerful responsible for water sharing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.