police arrested two youth for stealing motorcycle | मोटारसायकल चोरुन पेट्रोल संपेपर्यंत करायचे भटकंती; पोलिसांनी केलं गजाआड
मोटारसायकल चोरुन पेट्रोल संपेपर्यंत करायचे भटकंती; पोलिसांनी केलं गजाआड

उल्हासनगर: मोटारसायकल चोरून त्यातील पेट्रोल संपेपर्यंत चालवण्याची हौस करणाऱ्या दोन तरुणांना विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 10 मोटारसायकल व एक रिक्षा जप्त केली असून पोलीस या प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत.

उल्हासनगरात किमान दोन ते तीन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची नोंद विविध पोलीस ठाण्यात झाली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेली मोटारसायकल आकाश गायकवाड याच्या ताब्यात असल्याची माहिती विठ्ठलवाडी पोलिसांना मिळाली. त्यांनी आकाश गायकवाड याला जेरबंद केल्यावर, त्याने सर्व माहिती पोलिसांना दिली. रस्त्यावर मोटारसायकल दिसताच ती चोरून हौस फिटेपर्यंत चालवायचो आणि त्यानंतर ती मोटारसायकल बेवारस स्थितीतच सोडून द्यायची, अशी माहिती त्याने पोलिसांना दिली. यामध्ये त्याचा मित्र बिनसेन मोतीस सहभागी असल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी आकाश व बिनसेन मोतीस त्यांच्याकडून १० मोटारसायकली व १ रिक्षा हस्तगत केल्या आहे.

विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, बेनसन हा मोटारसायकल शौकीन असून मोटारसायकल चालवण्याचा छंद होता. मोटारसायकलचा छंद पूर्ण करण्यासाठी त्याने आकाशच्या मदतीने, चोरीचा सपाटा लावला. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल झाला असून त्यांच्या कडून पोलिसांनी ५ लाख ४० हजार किमतीच्या १० मोटरसायकल १ रिक्षा जप्त केल्या आहेत.
 


Web Title: police arrested two youth for stealing motorcycle
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.