सोशल मिडियावरील लाईक म्हणजे कलेला  मिळालेला प्रतिसाद नव्हे - विजयराज बोधनकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2018 05:47 PM2018-01-21T17:47:22+5:302018-01-21T17:47:57+5:30

सोशल मिडीयामुळे व्यंगचित्रकारांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आपली कला त्यांना संपूर्ण जगाला एकच वेळी दाखविता येते. परंतु त्या कलेला मिळालेले प्रतिसाद हा लाईक मध्ये मोजू नये. एखादया कलाकृतीला जास्त लाईक मिळाल्या म्हणून ती सुंदर कलाकृती आहे असे समजू नका. अनेक जण लाईक करतात.

The person on social media is not a well received response - Vijayraj Bodhankar | सोशल मिडियावरील लाईक म्हणजे कलेला  मिळालेला प्रतिसाद नव्हे - विजयराज बोधनकर

सोशल मिडियावरील लाईक म्हणजे कलेला  मिळालेला प्रतिसाद नव्हे - विजयराज बोधनकर

Next

 डोंबिवली - सोशल मिडीयामुळे व्यंगचित्रकारांना एक चांगली संधी उपलब्ध झाली आहे. आपली कला त्यांना संपूर्ण जगाला एकच वेळी दाखविता येते. परंतु त्या कलेला मिळालेले प्रतिसाद हा लाईक मध्ये मोजू नये. एखादया कलाकृतीला जास्त लाईक मिळाल्या म्हणून ती सुंदर कलाकृती आहे असे समजू नका. अनेक जण लाईक करतात. पण त्यातील मजकूर देखील त्यांनी वाचलेला नसतो, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार विजयराज बोधनकर यांनी बोलताना व्यक्त केले. 
    कार्टुनिस्ट कंबाईन यांच्यातर्फे व्यंगचित्रसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हास्यदर्शन 2क्18 हे अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकार संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात सोशल मिडीया आणि व्यंगचित्रे असा परिसंवाद ठेवण्यात आला होता. या परिसंवादात व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी, चारूहास पंडित, महेंद्र भावसार, गणोश जोशी, दै. ‘लोकमत’च्या पालघर आवृत्तीचे प्रमुख नंदकुमार टेणी, ज्येष्ठ पत्रकार कैलास म्हापदी आदी मान्यवरांनी सहभाग घेतला होता. कचराळी उद्यान येथे हा कार्यक्रम शनिवारी सायंकाळी पार पडला.
    बोधनकर म्हणाले, सोशल मिडीयाचा वापर गेल्या पाच वर्षापासून करीत आहे. हे एक प्रभावशाली माध्यम आहे. सोशल मिडीयाचा वापर योग्य त्या प्रमाणात केला पाहिजे. सोशल मिडीयामुळे घराघरात बातमी लगेच पोहोचते. त्यासाठी दुस:या दिवशीच्या वृत्तपत्रची आपण वाट पाहत नाही. प्रत्येक व्यंगचित्रकार कलावंतानी आपण वृत्तपत्रत कोणते व्यंगचित्र दिले आहे ते काळजीपूर्वक पाहावे. समाजाला व्यंगचित्र कळत नाही असे जर कलावंताला वाटत असेल तर तो गैरसमज आहे. समाज हा कलावंताची परिक्षा घेत असतो. चित्रकारांनी स्वत: चे परिक्षण स्वत: केले पाहिजे. दुस:यांनी चूका दाखवून देण्याची  वेळ येऊ नये. व्यंगचित्र लपविले तर ओळी कळणार नाही आणि ओळी लपविल्या तर व्यंगचित्र कळणार नाही. ही व्यंगचित्रची खरी ताकद आहे. अशाप्रकारचे व्यंगचित्र कलावंतानी काढली पाहिजे. व्यंगचित्रकारांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषा वापराव्यात म्हणजे ती अनेक लोकांर्पयत पोहोचतील, असे त्यांनी सांगितले.
 
सोशल मिडियावर मिळालेल्या लाईक्सचा उपयोग करुन घेता आला पाहिजे..    
चारूहास पंडित म्हणाले, सध्या चांगले काटरुनिस्ट राहिले नाही असे बोलणो चुकीचे ठरेल. मिडीयाजवळ कार्टुनिस्टकडे बघण्याचा डोळा नाही. चांगले काटरुनिस्ट तयार होत आहे. आता याकाळात ब्लॅक अॅण्ड व्हाईट सिनेमेच चांगले होते किंवा लोकमान्य टिळकांचे अग्रलेख चांगले होते असे बोलणो चुकीचे ठरेल. कार्टुनिस्टमध्ये ही वेगळे प्रवाह येत असतात. व्यंगचित्र कोण पाहते यातून जास्त सुस्पष्टता येईल. कलावंतालाही त्यातून अपग्रेड होता येईल. एखाद्या व्यंगचित्रला 15 लाख लोकांनी लाईक केले तर त्यांचा आर्थिक उपयोग काय? असे वाटेल. पण त्या लोकांचा उपयोग करून घेता आला पाहिजे. वृत्तपत्रचा खप हा मर्यादित असतो. सोशल मिडीयाला तसे लिमिटेशन नसतात. फेसबुक, युटयुब एवढय़ापुरता आता सोशल मिडीया मर्यादित राहिलेला नाही. इन्स्टाग्राम, टिवट्र अशी अनेक माध्यमे आहेत. त्यातून अर्थाजन ही करता येऊ शकते. सोशल मिडीया हे व्यंगचित्रकारांसाठी वृत्तपत्रच्या पुढचे माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले.
 
व्यंगचित्रकार समाजात दुही निर्माण करण्यासाठी चित्रकाढत नाही..    
प्रशांत कुलकर्णी म्हणाले, एखाद्या कलावंताला मासिकात किंवा वृत्तपत्रत व्यंगचित्र छापण्याची संधी मिळते किंवा कोणाला मिळत नाही. पण सोशल मिडीयामुळे प्रत्येकाला संधी ही मिळतेच. माङया व्यंगचित्रत काय त्रुटी आहेत हे सांगणारे संपादक मला माङया सुदैवाने मला भेटले. सोशल मिडीयात व्यंगचित्र प्रसिध्द करताना एक ज्येष्ठ व्यक्ती हवी असते. जी आपल्याला आपल्या त्रुटी सांगू शकतील. ही एक त्रुटी सोडली तर हे माध्यम अफाट आहे. मी आजर्पयत सोशल मिडीयात व्यंगचित्रे प्रसिध्द केली नाही. पण समाजासाठी काय चांगले आहे हे आपण स्व:तला सिध्द करतो तेव्हा समजते. आपल्या व्यंगचित्रमुळे दंगली व्हाव्यात असे कोणत्याही व्यंगचित्रकाराला वाटणार नाही. एखाद्या विषयावर मतभेद असू शकतो. त्यावर बोलण्याचा अधिकार आहे. पण बहिष्कार टाकणो हे योग्य नाही. व्यंगचित्रकार हा दोन समाजात दुही निर्माण व्हावी म्हणून चित्रे काढत नाही. व्यंगचित्रकाराला आपला देश , समाज काय आहे याचे भान राखणो गरजेचे आहे. हे भान राखल्यास सोशल मिडीयासारखे माध्यम नाही, असे त्यांनी सांगितले.
 
रंग देखील जातीधर्मात विभागले गेले आहेत..
गणोश जोशी म्हणाले, भाषा कोणती वापरता त्यावेळी प्रिंट मिडीया असो किंवा सोशल मीडिया असो. तिथे वाचक कोणत्या भाषेचा आहे. त्यावर मर्यादा येतात. चित्रे काढताना शब्द नसतील तर ते कोणत्याही विषयावर असेल ते जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचून त्यावर रिप्लाय येतो. त्यांचा न्यायनिवाडा लगेच होतो. तुम्ही चुकीचे मांडले तर त्यावर लगेच प्रतिक्रिया उमटतात. काटरुन जेव्हा छापून येतात तेव्हा नेत्याला काही वाटत नाही. पण कार्यकर्ता विभागला गेला आहे. त्यांच्या मतभेद दिसून येते. कोणता रंग वापरायचं हा प्रश्न निर्माण होतो. कलावंताला सगळे रंग सारखे असतात. रंग देखील जाती धर्मामध्ये विभागले गेले आहेत. कट्टरवाद, धार्मिक, जातीयवाद यांचा फटका तुम्हाला नक्की बसतो. कोणाच्या भावना दुखवल्यास माफी देखील मागता आली पाहिजे. सोशल मिडीयावर मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राच्या बाहेर मला ओळख सोशल मिडीयामुळे मिळाली आहे,  असे त्यांनी सांगितले.

Web Title: The person on social media is not a well received response - Vijayraj Bodhankar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.