लोकांना लुबाडणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 12:10 AM2018-12-14T00:10:34+5:302018-12-14T00:10:43+5:30

१३ आरोपींना ठोकल्या बेड्या; २0 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत, पोलिसांना यश

People robbed of people | लोकांना लुबाडणारी टोळी जेरबंद

लोकांना लुबाडणारी टोळी जेरबंद

Next

ठाणे : वयोवृद्ध नागरिकांना जुनी ओळख असल्याचे भासवून तसेच बोलण्यात गुंतवून हातचलाखीने दागिने लंपास करणाऱ्या दहा जणांच्या टोळक्यासह सोनसाखळी खेचून पळ काढणारे तिघे अशा १३ जणांच्या टोळीला नौपाडा, कळवा आणि ठाणेनगर पोलिसांच्या विविध पथकांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून २० लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती ठाण्याचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी दिली.

बँकेत तसेच सराफाच्या दुकानांमध्ये येणाºया वयोवृद्ध नागरिकांना बोलण्यात गुंतवून त्यांना नोटांसारख्या कागदांचे बंडल देऊन ही टोळी खरे पैसे घेऊन पसार होत होती. ठाणेनगर पोलिसांनी १२, कळवा पाच, नौपाडा १४ तर राबोडी एक अशा फसवणुकीच्या ३२ तर सोनसाखळी चोरीच्या आठ गुन्ह्यांची त्यांच्याकडून उकल केली आहे. त्यांच्याकडून ६६१ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३० हजारांची रोकड असा २० लाख तीन हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहितीही स्वामी यांनी दिली.

गेल्या अनेक दिवसांपासून ठाणे परिसरात असे प्रकार वाढल्याने पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त स्वामी यांना हे गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर कळवा विभागाचे सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर, उपनिरीक्षक कृष्णा बाबर तसेच नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव आणि संजय धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे तसेच कळवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस शेखर बागडे आणि उपनिरीक्षक सय्यद आदींच्या पथकाने या टोळीला जेरबंद केले. यामध्ये राजू शेट्टी (रा. अँटॉप हिल), रमेशकुमार जैस्वाल (रा. मुंबई), विलास दळवी (रा. उल्हासनगर), दिनेश सुराडकर (रा. उल्हासनगर), संजय महांगडे (सध्या पोलीस कोठडीत) , मोहम्मद आसीम मनीहार संजय महांगडे, मोहम्मद मनीहार (रा. आंबिवली) गणेश लोंढे (रा. मुंबई), शारबोन इस्लाम (रा. मुंब्रा ), शंकर उर्फ मरीअप्पन मुरगेशन (सध्या पोलीस कोठडीत), कुष्णकुमार सिंग, प्रदीप पाटील (रा. म्हारळ, कल्याण) अर्जुन सलाट आणि अर्जुनभाई मारवाडी यांचा यात समावेश आहे. सात जणांना न्यायालयीन तर सहा जणांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यात इराणी, गुजराती आणि काही मराठी चोरट्यांचाही समावेश आहे.

आरोपींवर होती पोलिसांची करडी नजर
हे भामटे रस्त्याने जाणाºया वयोवृद्धांना अडवून त्यांना धार्मिक गोष्टी सांगून देवाची तसेच पोलीस अधिकाºयाची भीती दाखवून त्यांना सोन्याचे दागिने काढून ठेवण्यास सांगायचे. पन्नास पाऊले मागे वळून न बघता पुढे, जा अशी बतावणी करून ते दागिने लंपास करीत होते.

शेठजीला मुलगा झाला असून पुढे साड्यांचे वाटप केले जात आहे. तुम्ही गरीब वाटायला हवे म्हणून दागिने काढून पिशवीत ठेवा अशी शक्कल लढवून ते वृद्धांना गंडा घालत होते. पोलीस पथकांनी टोळीच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करून त्यांच्यावर नजर ठेवली आणि टोळीचा पर्दाफाश केला.

Web Title: People robbed of people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.