मित्रासोबत शारीरिक संबंधांसाठी छळ, टिटवाळा पोलिसांनी केली पतीसह एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 03:26 AM2017-11-25T03:26:22+5:302017-11-25T03:26:44+5:30

टिटवाळा : विवाहितेला तिच्या पतीनेच त्याच्या मित्राबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी छळ केल्याचा प्रकार सांगोडा गावात घडला आहे.

Patiala police interrogated with friend, Titwala police arrested a man along with her husband | मित्रासोबत शारीरिक संबंधांसाठी छळ, टिटवाळा पोलिसांनी केली पतीसह एकाला अटक

मित्रासोबत शारीरिक संबंधांसाठी छळ, टिटवाळा पोलिसांनी केली पतीसह एकाला अटक

Next

टिटवाळा : विवाहितेला तिच्या पतीनेच त्याच्या मित्राबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी छळ केल्याचा प्रकार सांगोडा गावात घडला आहे. याप्रकरणी विवाहितेने टिटवाळा पोलिसात तक्रार दिली. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पती नितीन पाटील आणि त्याचा मित्र नितीन मोगरे यांना पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित महिलेचे २००७ मध्ये सांगोडा येथील नितीन पाटीलशी लग्न झाले. वर्षभरानंतर तो पत्नीला माहेरून पैसे आणण्यासाठी शिवीगाळ करत असत. मात्र, भावाला हृदयविकार असल्याने तिने माहेरी ही बाब सांगितली नाही. २०११ मध्ये तीन मुलांनंतर पतीने तिला प्रकृती सक्षम नसतानाही कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला अस्वस्थ वाटू लागल्याने गोवेली रुग्णालयात नेण्याचा बहाणा करत तिला घराबाहेर नेले. वाटेत मित्र मोगरे याला फोन करून बोलावून घेतले. तेथे मोगरे याच्याशी शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती केली. मात्र तिने विरोध केल्यानंतरही मोगरे याने तिला झाडाझुडपात ओढत नेत अत्याचार केला. या प्रकाराबाबत वाच्यता केल्यास ठार मारण्याचीही धमकी दिली.
२०१५ मध्येही पीडित महिला व पाटील एका लग्न समारंभातून गाडीने परतत होते. या वेळी पिसा धरण परिसरात आधीच हजर असलेल्या मोगरे याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. २०१७ मध्येही गणेशोत्सवादरम्यान पाटील याने बाहेर जाण्याचे कारण सांगून तिला निर्जन रस्त्यावर नेले. तेथेही मोगरे याने तिच्यावर बलात्कार केला. तसेच सासू, सासरे व नणंद यांनीही किरकोळ कारणावरून मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप पीडित महिलेने टिटवाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
>पोलीस कोठडीत रवानगी
महिलेचा पती नितीन पाटील व त्याचा मित्र नितीन मोगरे यांना न्यायालयाने तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Web Title: Patiala police interrogated with friend, Titwala police arrested a man along with her husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.