ठाण्यातील ३७९ व्या अभिनय कट्ट्यावर पार्टनर्स एकांकिकेच सादरीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 03:54 PM2018-06-05T15:54:59+5:302018-06-05T15:54:59+5:30

३७९ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर खास वैशिष्ट होते ते म्हणजे "पार्टनर्स" या एकांकिकेचे सादरीकरण.

PARTNERS ONE PARTY PROJECT ON 379 WORKING KATTLE in Thane | ठाण्यातील ३७९ व्या अभिनय कट्ट्यावर पार्टनर्स एकांकिकेच सादरीकरण

ठाण्यातील ३७९ व्या अभिनय कट्ट्यावर पार्टनर्स एकांकिकेच सादरीकरण

Next
ठळक मुद्दे अभिनय कट्ट्यावर पार्टनर्स एकांकिकेच सादरीकरणकट्ट्याच्या कलाकारांनी एकपात्री व द्विपात्रीचे केले सादरीकरण  वेगवेगळ्या छटा असणाऱ्या एकांकिकेला प्रेक्षकांनी दिली भरभरून दाद

ठाणे : नुकत्याच पार पडलेल्या ३७९ व्या अभिनय कट्ट्याच प्रमुख आकर्षण होत संदेश कुलकर्णी लिखित "पार्टनर्स" एकांकिकेच सादरीकरण करण्यात आले. 

   सर्वप्रथम अभिनय कट्ट्याच्या कलाकारांनी एकपात्री व द्विपात्रीचे  सादरीकरण  केले. त्यामध्ये  विश्वजित वाघ याने "समझने कि कोशिश करो", अभिषेक निगम याने "Need  to  Be  Stop", शिल्पा लाडवंते हिने 'पॉलीसी", सहदेव कोळंबकर याने "तो मी नव्हेच " व शुभांगी गजरे हिने "आम्ही दोघ राजाराणी" या नाटकातील एक प्रवेश सादर केला. त्याचबरोबर परेश दळवी व सहदेव साळकर याने " पप्पू पास हो गया"  या द्विपात्रीचे सादरीकरण केले. त्यानंतर कट्ट्याचे प्रमुख आकर्षण असलेल्या संदेश कुलकर्णी लिखित व अभिषेक सावळकर दिग्दर्शित " पार्टनर्स " एकांकिकेच सादरीकरण  करण्यात आले. कॉलेज लाईफ मध्ये बऱ्याच आठवणी चा साठा तयार होतो , आणि त्यात सर्वात महत्वाचे म्हणजे हॉस्टेल मधील रूम पार्टनर्स, रक्ताच्या नात्या पलीकडे जाऊन घट्ट बंध तयार झालेल्या तीन मैत्रिणींची गोष्ट म्हणजे पार्टनर्स एकांकिका . हसत खेळत सुरु होणारी एकांकिका प्रेक्षकांना विनयभंगा सारख्या गंभीर विषयावर घेऊन जाते . शेवटी स्त्रीयांनी आपल्या सुरक्षेसाठी कुणावर अवलंबून न राहता स्वतः परिस्थितीशी लढावं तरच अन्याय थांबेल असा बोध  सर्वांना या एकांकिकेतून देण्याचा प्रयत्न टीम ने केला . वृषाली , माधवी , प्रियांका अशा  या तीन मैत्रिणीं ची भूमिका साकारली  ती म्हणजे  वीणा छत्रे , श्रावणी कदम आणि शिवानी देशमुख यांनी.  तसेच या एकांकिकेचे  संगीत संयोजन कुंदन भोसले, नेपथ्याची धुरा सांभाळली सहदेव साळकर ,सहदेव कोळम्बकर, परेश दळवी यांनी .  या सगळ्या टीम ला मार्गदर्शन लाभले ते संस्थापक किरण नाकती यांचे . हसू आणि आसू अश्या वेगवेगळ्या छटा असणाऱ्या एकांकिकेला प्रेक्षकांनी सुद्धा भरभरून दाद दिली. तसेच संपूर्ण कट्ट्याचे निवेदन रोहिणी थोरात, हर्षदा शिंपी व न्यूतन लंके यांनी केले.

Web Title: PARTNERS ONE PARTY PROJECT ON 379 WORKING KATTLE in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.