दहावीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 06:06 AM2018-03-20T06:06:52+5:302018-03-20T06:06:52+5:30

दहावीची परीक्षा सुरू असतानाच सोमवारी सकाळी ९.३०च्या सुमारास इंग्रजी माध्यमाच्या समाजशास्त्र विषयाचा पेपर मोबाइलवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.

 Paper of sociology of Class XI broke out | दहावीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर फुटला

दहावीचा समाजशास्त्र विषयाचा पेपर फुटला

Next

कल्याण : दहावीची परीक्षा सुरू असतानाच सोमवारी सकाळी ९.३०च्या सुमारास इंग्रजी माध्यमाच्या समाजशास्त्र विषयाचा पेपर मोबाइलवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली.
दहावीच्या इंग्रजी माध्यमाच्या समाजशास्त्र विषयाचा पेपर सोमवारी सकाळी होता. परीक्षार्थी परीक्षा देण्याची तयारी करत असताना ९.४५च्या सुमारास कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या शिक्षिका मेघा बागोरे यांच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर समाजशास्त्र विषयाच्या पेपरची प्रश्नपत्रिका आली. ज्या नंबरवरून प्रश्नपत्रिका आली, त्यावर फोन केला. त्या वेळी समोरील व्यक्तीने त्यांना सांगितले की, हा पेपर माझ्या मुलाकडून तुम्हाला चुकून पाठवला गेला आहे. त्यानंतर, त्याने हा मेसेज त्वरित डीलीट केला. त्यानंतर बागोरे यांनी टिटवाळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

Web Title:  Paper of sociology of Class XI broke out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा