Palghar bye-election of Vijay Sena - Aditya Thackeray | पालघर पोटनिवडणुकीत विजय हा सेनेचाच - आदित्य ठाकरे
पालघर पोटनिवडणुकीत विजय हा सेनेचाच - आदित्य ठाकरे

रविंद्र साळवे

मोखाडा :  पालघर पोटनिवडणुकीत विजय हा शिवसेनेचाच असेल असे प्रतिपादन  युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मोखाडा येथे केले. सेनेचे लोकसभेचे उमेदवार श्रीनिवास वणगा यांच्या प्रचार रॅलीत मार्गदर्शन करत असताना ते बोलत होते  विजयानंतर  मोखाद्याचा पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवू आम्ही इथे कुणालाही हरवायला आलेलो नाही वणगा कुटुंबावर अन्याय झाल्याने आम्ही ही निवडणूक लढवत आहोत भाजपा पक्षाला नकीच मतदार धडा शिकवेल भाजपा वर सर्वच नाराज असताना  समाधानी कोण आहेत असा प्रश्न यावेळी  आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला

   ज्या पक्षाला त्यांच्या कामाची किंमत कळाली नाही तो पक्ष कै  चिंतामण वणगा साहेबांचा फोटो लावून मत मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत  असे  यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले  तसेच मतदार हा शिवसेनेलाच मतदान करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी श्रीनिवास यांनी  भाजपा कडून झालेला अन्याय बोलून दाखवला  पालकत्व नसलेल्या कुटुंबाला  भाजपने वाऱ्यावर सोडले  ज्या वणगा साहेबानी भाजप वाढवली 35 वर्ष पक्षासाठी सेवा केली त्या कुटूंबाला वाऱ्यावर सोडून अन्यायच केला आहे परंतु  उद्धवजी ठाकरेना आम्हाला आधार दिला  मातोश्रीवर भेटून कुटुंबातील आपण एक सदस्य आहोत याची जाणीव झाली  आपण सर्वांनी सेनेला मतदान करून खऱ्या अर्थाने कै चिंतामण वणगा साहेबाना  श्रध्दांजली वाहायची आहे असे भावनिक आव्हान केले  

 


Web Title: Palghar bye-election of Vijay Sena - Aditya Thackeray
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.