वन-डे ट्रीपला पसंती : व्हॉट्सअ‍ॅपवर पिकनिक प्लान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 06:44 AM2018-06-10T06:44:11+5:302018-06-10T06:44:11+5:30

मान्सूनचे दमदार आगमन होताच तरुणाई पिकनिकच्या मूडमध्ये आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा पावसाने लवकर बरसण्यास सुरुवात केल्याने पिकनिक, ट्रेक किंवा धबधब्यांवर जाण्याच्या प्लान्सने व्हॉट्सअ‍ॅप दुथडी भरून वाहू लागले आहे.

 One-day trip likes: WhitsAppe Picnic Plan! | वन-डे ट्रीपला पसंती : व्हॉट्सअ‍ॅपवर पिकनिक प्लान!

वन-डे ट्रीपला पसंती : व्हॉट्सअ‍ॅपवर पिकनिक प्लान!

Next

ठाणे - मान्सूनचे दमदार आगमन होताच तरुणाई पिकनिकच्या मूडमध्ये आली आहे. गेल्या वर्षीपेक्षा यंदा पावसाने लवकर बरसण्यास सुरुवात केल्याने पिकनिक, ट्रेक किंवा धबधब्यांवर जाण्याच्या प्लान्सने व्हॉट्सअ‍ॅप दुथडी भरून वाहू लागले आहे.
गेले काही दिवस कमालीचा उकाडा असल्याने सुटीच्या दिवशी बाहेर पडण्याचा विचारही करणे मुश्कील होते. मात्र, पावसाच्या सरी कोसळू लागताच निसर्ग बहरलेला असतो. हा बहरलेला निसर्ग सहलप्रेमींना खुणावू लागला असून जून महिन्याच्या अखेरीस अथवा जुलैमधील पिकनिकच्या प्लानिंगला उधाण आले आहे. तरुणाईचे कट्टे किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर पिकनिकच्या गप्पा रंगू लागल्या आहेत. सहलप्रेमींना धबधबे, ट्रेकिंग पॉइंट, रिसॉर्ट खुणावू लागले आहेत. कित्येक फुटांच्या उंचीवरून येणारे फेसाळते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. भंडारदरा, कोंडेश्वर, वदप, भुशी डॅम, भिवपुरी, पळसदरी, माथेरान, तुंगारेश्वर, राधा फॉल, पांडवकडा, झेनिथ, गाढेश्वर, फणसाड, आषाणे, थिदबीचा धबधबा, असे प्लान सुरू झाले आहेत. ट्रेकिंगसाठी गड, किल्ले यांची निवड सुरू आहे. लोणावळा, खंडाळा, माळशेज घाट यासारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरच जवळपासचे धबधबे किंवा व्हर्जिन पिकनिक स्पॉट शोधण्याची चर्चा सुरू झाली आहे. वीकेण्डला कोसळणारा पाऊस ही तर वन-डे पिकनिकसाठी पर्वणी असल्याने काही पहिल्या पावसाचा आनंद घेण्याकरिता रवाना झाले आहेत. नंतर, पावसाला ब्रेक लागेल आणि गेल्या दोन वर्षांप्रमाणे पिकनिकचे प्लानिंग फसेल, त्यामुळे पाऊस कोसळत असतानाच छोटा ग्रुप करून घराबाहेर पडा, असा सूर आहे. गेली दोन वर्षे जून महिना संपायला आला, तरी पावसाने ठाणे, मुंबई परिसरांत दडी मारल्याने तरुणाईच्या पावसाळी पिकनिकच्या उत्साहाला ब्रेक लागला होता. पावसाळी पिकनिकला घराबाहेर पडायचे आणि पावसाचा पत्ताच नसेल, तर सर्वच प्लानिंग फसते. त्यामुळे अगोदर प्लान करून पिकनिक या कल्पनेला फारशी पसंती नाही. यंदा पाऊस लवकर आलाय. तो समाधानकारक पडण्याचे भाकीत आहे. त्यामुळे पिकनिकचे मुहूर्त लाभतील, अशी आशा आहे.

यंदा मी भंडारदरा आणि तिथून जवळच असणाऱ्या हरिश्चंद्र गडला जाणार आहे. निसर्गरम्य परिसर आणि पाऊस क्या बात... मुंबईचे धबधबे आता पार्टी करण्याचे स्पॉट झालेत. त्यामुळे थोडे लांब पण निवांत ठिकणीच जाणार आहे.
- हनिफ तडवी, डोंबिवली
पावसाच्या सरींनी चिंब भिजवायला सुरु वात केली आहे. त्यामुळे प्रत्येकालाच पावसाळी सहलीचे वेध लागले आहेत. निसर्गप्रेमींनी आवर्जून इथे भेट द्यावी, असे हे ठिकाण म्हणजे अलिबाग येथील फणसाड धबधबा. या जागेचे वैशिष्ट्य असे की डोंगर, धबधबा आणि जवळच असलेला काशीद बीच. निसर्गाचे प्रत्येक रूप इथे अनुभवायला मिळत असल्याने या पावसाळ्यात फणसाडची सहल नक्की.
- प्रतीक्षा पांढरे, ठाणे

पाऊस सुरू झाला आहे. पिकनिक आणि ट्रेकसाठी ही अगदी योग्य वेळ आहे. त्यापुढचा वीकेण्ड मोठा आहे. त्यामुळे कुठेतरी नदीकाठी असलेल्या रिसॉर्टला जाऊन मजा किंवा नेहमीप्रमाणे मोठ्या ट्रेकिंगला सुरुवात करणार आहे. - निखिल लोखंडे, ठाणे

खूप दिवसांपासून वाट पाहायला लावणारा पाऊस नेमका आलाच. उन्हाळ्यात सह्याद्रीभ्रमंती करणे म्हणजे खूपच त्रासदायक. म्हणूनच, पावसाळा सुरू झाला की, बॅग उचलायची आणि निघायचे. अजून थोडा पाऊस पडला की, हरिश्चंद्र गड (कोकणकडा), हरिहर गड आणि साल्हेर-सालोट, तसेच बाइक राइडला जायचासुद्धा प्लान करणार. - भावेश समर्थ, ठाणे

या पावसाळ्यात आमचा प्लान आहे, नाशिकजवळ पहिणे धबधब्याला जाण्याचा. पहिणेजवळच गावाच्या ठिकाणी वर दºयांमध्ये लपलेला धबधबा आहे. त्यामुळे या धबधब्याला जायचे असेल, तर ट्रेकिंग करत. त्यामुळे इथे ट्रेकिंग आणि पिकनिकही होते.
- अनुश्री जुन्नरकर, ठाणे

Web Title:  One-day trip likes: WhitsAppe Picnic Plan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.