एका दिवसात ३०३ फेरीवाल्यांवर कारवाई करून २८४ हातगाड्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 11:57 PM2019-06-21T23:57:14+5:302019-06-21T23:57:23+5:30

आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशानुसार कारवाई

In one day, 284 ports were seized and 303 ferries were seized | एका दिवसात ३०३ फेरीवाल्यांवर कारवाई करून २८४ हातगाड्या जप्त

एका दिवसात ३०३ फेरीवाल्यांवर कारवाई करून २८४ हातगाड्या जप्त

ठाणे : ठाणे महानगरपालिकेने शुक्रवारी केलेल्या धडक कारवाईत ३०३ फेरीवाल्यांवर कारवाई करून २८४ हातगाड्याही जप्त केल्या. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.

याअंतर्गत कोपरीमध्ये ३७ फेरीवाले व ३३७ हातगाड्या, नौपाड्यामध्ये ३७ फेरीवाले व ३७ हातगाड्या, वागळे प्रभाग समितीमध्ये २० फेरीवाले, ७० हातगाड्या, लोकमान्यनगर- सावरकर प्रभाग समितीमध्ये ३९ फेरीवाले व २७ हातगाड्या, वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत ५२ हातगाड्या ५२ फेरीवाले, माजिवडा मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत २३ फेरीवाले व १० हातगाड्या, उथळसर प्रभाग समितीमध्ये १५ फेरीवाले व १२ हातगाड्या, कळव्यामध्ये ५८ फेरीवाले १७ हातगाड्या, मुंब्रा प्रभाग समितीअंतर्गत १५ फेरीवाले व सहा हातगाड्या, तर दिवा-शीळ परिसरात सात फेरीवाले व १६ हातगाड्यांवर धडक कारवाई केली. अतिक्र मण विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली.

Web Title: In one day, 284 ports were seized and 303 ferries were seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.