स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात'भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा चित्रमय इतिहास' या विषयावर प्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 05:00 PM2018-08-15T17:00:52+5:302018-08-15T17:10:08+5:30

स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात'भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा चित्रमय इतिहास' या विषयावर भरविलेले प्रदर्शन उद्यापर्यंत खुले असेल. 

On the occasion of Independence Day, on the issue of 'History of the Indian Independence', in JnanSadhana College, Thane | स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात'भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा चित्रमय इतिहास' या विषयावर प्रदर्शन

स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात'भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा चित्रमय इतिहास' या विषयावर प्रदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देभारतीय स्वातंत्र्य लढ्याचा चित्रमय इतिहास' या विषयावर प्रदर्शन दुर्मिळ छायाचित्रांचे हे प्रदर्शन : प्राचार्य डॉ. सी डी मराठेया प्रदर्शनात १८५७ च्या उठावापासून १९४७ पर्यंतच्या विविध घटनांचे जुने कागदपत्रे,व तत्कालीन घटनांचे छायाचित्रे

ठाणेस्वातंत्र्यदिनानिमित्त सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातीलइतिहास व पायाभूत अभ्यासक्रम (F. C) विभागातर्फे 'भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा चित्रमय इतिहास' या विषयावर  प्रदर्शन भरविण्यात आले आहे . प्रदर्शनाचे उदघाटन संस्थेचे अध्यक्ष सतीश प्रधान व  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी डी मराठे यांच्या हस्ते  करण्यात आले. 

या प्रदर्शनात १८५७ च्या उठावापासून १९४७ पर्यंतच्या विविध घटनांचे जुने कागदपत्रे, पोलीस अहवाल व तत्कालीन घटनांचे छायाचित्रे दाखविण्यात येत आहे. यामध्ये १ नोव्हेंबर १८५८ मधील राणीचा जाहीरनामा, नानासाहेब पेशवांचे इशारापत्र, क्रांतिकारकांची घटना,  १८५७  मधील भारताचा नकाशा रंगो बापूजीचे पत्र, १८८५ मधील राष्ट्रीय काँग्रेस ची पहिली परिषदेचे ठिकाण त्याचा अहवाल,  लोकमान्य टिळक यांच्या अटकेची १९०८ मधील तार, वि, दा, सावरकर यांच्या १९११ मधील जन्मठेपेचा निकाल, १९२३ चा राष्ट्रीय ध्वज, लाहोर कटातील पोलीस अहवाल, एन एम राय यांच्या सुटकेची मागणी करणारे कामगांरांचे मागणी पत्र,  पंडित मालवीय यांचे स्वराजयचे आवाहन करणारे पत्र, २६ जानेवारी १९३५ चे स्वातंत्र्य बाँबे काँगेस बुलेटिन, पहिली महिला सत्याग्रही, १९४२ च्या चळवळीचा पोलीस अहवाल, प्रती/पत्री सरकारचे हस्तलिखित, बाँबे स्टुडंट्स युनियन चे पत्रे या दुर्मिळ  दस्तावेजांचा  समावेश आहे. यावेळी संस्थेचे सचिव कमलेश प्रधान, खजिनदार सतीश सेठ हे उपस्थित होते. हे प्रदर्शन दिनांक १६ ऑगस्ट २०१८ पर्यंत दुपारी १ वाजेपर्यंत सर्वांना मोफत खुले असेल असे महाविदयलाचे उप प्राचार्या व आयोजक विद्या प्रभू यांनी सांगितले आहे. या प्रदर्शनाच्या  नियोजनामध्ये इतिहास व पायाभूत अभ्यासक्रम  या विषयाच्या  सीमा केतकर, रुपाली मुळ्ये आणि सचिन पुराणिक यांनी मदत केली. या प्रदर्शनातील सर्व कागदपत्रे व  माहिती ही महाराष्ट्र पुराभिलेख येथून घेण्यात आली आहेत असे इतिहासाचे सहायक प्राध्यापक बाबासाहेब कांबळे यांनी सांगीतले. प्राचार्य डॉ. सी डी मराठे म्हणाले कि, दुर्मिळ छायाचित्रांचे हे प्रदर्शन आहे. केवळ विद्यार्थ्यांना नव्हे तर सरावानेच यातून माहिती मिळेल. ज्यांनी ज्यांनी हे प्रदर्शन पहिले त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. 

Web Title: On the occasion of Independence Day, on the issue of 'History of the Indian Independence', in JnanSadhana College, Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.