विजेच्या खाजगीकरणाविरोधात आता सर्वपक्षीय एकजूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:47 PM2019-01-14T23:47:04+5:302019-01-14T23:47:32+5:30

टोरंट कंपनीला विरोध : कळवा, मुंब्रा, दिव्यात बंद पाळण्याचा इशारा

Now against the privatization of the electricity alliance is united | विजेच्या खाजगीकरणाविरोधात आता सर्वपक्षीय एकजूट

विजेच्या खाजगीकरणाविरोधात आता सर्वपक्षीय एकजूट

Next

ठाणे : कळवा, मुंब्रा आणि दिव्यातील वीज वितरणाच्या खाजगीकरणाचे काम भिवंडीत वीजपुरवठा करणाऱ्या टोरंट कंपनीला देण्याचे ‘महावितरण’ने निश्चित केले आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत टोरंट कंपनीला कळवा, मुंब्य्रात पाय ठेवू न देण्याचा इशारा सर्वपक्षीय नेत्यांनी खाजगीकरणाला विरोध करण्यासाठी सोमवारी बोलावलेल्या बैठकीत सर्वानुमते घेतला आहे. या भागात सक्तीने वीज पुरवठ्याचे खाजगीकरण करण्यास परवानगी दिली, तर कळवा, मुंब्य्रात बंद पाळण्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.


ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये घेण्यात आलेल्या या बैठकीत राष्टÑवादीचे आ. जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे आ. सुभाष भोईर, भाजपाचे आ. किसन कथोरे, शिवसेनेचे कल्याणचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, नगरसेवक राजन किणे, उमेश पाटील, दशरथ पाटील, प्रकाश बर्डे, बाबाजी पाटील, धर्मराज्य पक्षाचे पदाधिकारी आणि इतर संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कळवा, मुंब्रा भागातील वीजचोरी, गळती रोखण्यासाठी महावितरणने या भागात विजेचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, टोरंट कंपनीला हे काम दिले जाणार आहे. या खाजगीकरणाच्या मुद्यावरून राष्टÑवादीपाठोपाठ आता शिवसेनासुद्धा आक्रमक झाली आहे. या कंपनीचा भिवंडीतील अनुभव फार वाईट आहे, त्यामुळे आमचा या खाजगीकरणाला आणि संबंधित कंपनीलाही विरोध असल्याचे आ. भोईर यांनी सांगितले.

टोरंट कंपनीला दिलेले ‘लेटर आॅफ इंटरेस्ट’ तातडीने रद्द करण्याची मागणी भोईर यांनी ऊर्जामंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. कळवा, मुंब्य्रातच नव्हे तर, संपूर्ण ठाण्यातील महावितरणच्या ग्राहकांना वाढीव बिले येत आहेत. अचानक वाढलेल्या या बिलांविरोधात राष्ट्रवादीने आक्र मक भूमिका घेतली असून यावर तोडगा काढला नाही, तर वागळे इस्टेट भागातील महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा आ.आव्हाड यांनी दिला. शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी या कंपनीच्या विरोधात ऊर्जामंत्र्यांना पत्र दिले आहे.


दरम्यान, या वादग्रस्त कंपनीला पायही ठेवू न देण्याचा आणि गुरु वारपर्यंत शासनाने यासंदर्भात ठोस निर्णय न घेतल्यास महावितरणच्या कार्यालयावर लाखोंचा मोर्चा नेण्याचा इशारा ज्येष्ठ नेते दशरथ पाटील यांनी यावेळी दिला. वेळ पडल्यास कळवा, मुंब्रा आणि दिवा बंदची हाक देण्याची भूमिकाही यावेळी घेण्यात आली. महावितरणचे मुंब्रा विभागामध्ये अंदाजे ८४ हजार, दिवा व शीळ, देसाई विभागात ५६ हजार आणि कळवा विभागात सुमारे ६० हजार ग्राहक असून या विभागातील नागरिकांमध्ये खाजगीकरणाबाबत संताप निर्माण झाला आहे.

Web Title: Now against the privatization of the electricity alliance is united

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज