नितेश राणे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 01:31 AM2018-07-31T01:31:35+5:302018-07-31T01:31:45+5:30

ठाण्यात आरक्षणासाठी २५ जुलै रोजी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेक मराठा तरुणांची धरपकड करून अनेकांना अटक केली. काहींना संशयावरून घरातून उचलून नाहक मारहाण केली जात आहे.

 Nitesh Rane visits a Commissioner of Police | नितेश राणे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

नितेश राणे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट

Next

ठाणे : ठाण्यात आरक्षणासाठी २५ जुलै रोजी झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेक मराठा तरुणांची धरपकड करून अनेकांना अटक केली. काहींना संशयावरून घरातून उचलून नाहक मारहाण केली जात आहे. या मारहाणीची चौकशी करून संबंधितांवर कारवाईची मागणी आमदार नितेश राणे यांनी सोमवारी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे केली. कलम ३०७ मुळे या तरुणांचे करिअर उद्ध्वस्त होणार असल्यामुळे हे कलमही मागे घेण्याची मागणी त्यांनी या वेळी केली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ठाण्यात बुधवारी ‘ठोक मोर्चा’ काढला होता. यावेळी बंद आणि रास्ता रोकोही झाले. मात्र, नियंत्रणाबाहेर गेलेल्या जमावापैकी काहींनी पोलिसांवर दगडफेक करून अनेक वाहनांची तोडफोड केली. याप्रकरणी ठाण्यात आतापर्यंत ४५० जणांविरुद्ध गुन्हे दाखल आहेत. अनेकांची चौकशी करून सोडण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राणे यांनी सोमवारी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. सनील राजिवडे या तरुणाला चौकशीसाठी बोलावून नौपाडा पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी आमदार राणे यांच्याकडे केली. याप्रकरणीही मारहाण करणाऱ्यांवर चौकशी करून त्यांच्यावर कारवाईची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली. त्याला आयुक्त सिंग यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे ते म्हणाले.

- सेनेने आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली होती. आता नारायण राणे यांनी यात महत्त्वाची भूमिका घेतल्याने केवळ राणेंना श्रेय नको म्हणून सेनेनेही आरक्षणाची मागणी केली. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे कसले आले शहाणपण, असा चिमटाही त्यांनी काढला. समाजासाठी बांधीलकी असल्यामुळे आरक्षण मिळवून देण्याची राणे कुटुंबीयांचीही जबाबदारी असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले.

Web Title:  Nitesh Rane visits a Commissioner of Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.