कल्याण पूर्वेला नवे मैदान, १२ एकर जागा, निधी देण्याचेही आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क on Sat, November 11, 2017 12:42am

पूर्वेतील १२ एकर जागेवर मैदान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी खासदार निधी देण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे

कल्याण : पूर्वेतील १२ एकर जागेवर मैदान विकसित केले जाणार आहे. त्यासाठी खासदार निधी देण्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. अडीच एकर जागा महापालिकेच्या ताब्यात असून उर्वरित जागाही महापालिकेने ताब्यात घ्यावी, असे आदेश शिंदे यांनी या वेळी महापालिकेच्या अधिका-यांना दिले आहे. कल्याण, तिसगाव येथील १०० फुटी रोडलगत मैदानासाठी आरक्षित असलेल्या जागेची शिंदे यांनी पाहणी केली. या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, सभागृह नेते राजेश मोरे, गटनेते रमेश जाधव, नगरसेवक मल्लेश शेट्टी, नवीन गवळी आदी मान्यवर उपस्थित होते. मैदान विकसित करण्यासाठी खासदार निधीतून निधी देण्याचेही आश्वासन शिंदे यांनी दिले आहे. दरम्यान, खासदारांनी कल्याण-मलंग रस्त्याच्या कामाचीही पाहणी केली. रस्त्याच्या मध्ये येणारे विजेचे खांब हटवले जावेत. मुख्य कामाला गतीने सुरुवात करावी. तसेच या रस्त्यावर बरीच रहदारी असल्याने रस्त्याचा एक भाग मोकळा ठेवून उर्वरित भागाचे काम करावे, अशा सूचना शिंदे यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

संबंधित

उल्हासनरची समीक्षा अग्रवाल देशात तिसरी
एम्स रुग्णालयातील धक्कादायक घटना; आजाराला कंटाळून रुग्णाने केली आत्महत्या 
डोंबिवलीतील लैंगिक शोषणः आरोपींना शोधून काढण्यासाठी पोलीस बनले बांधकाम मजूर
ठाण्यात दिवसाढवळ्या विनापरवाना शस्त्र घेऊन फिरणारे अटकेत 
युद्धपातळीवर काम सुरू ठेवा, खड्डे बुजवण्यासाठी पालकमंत्री रस्त्यावर 

ठाणे कडून आणखी

टीएमटी कार्यशाळेत आता रात्रीही दुरुस्ती
कल्याण-अंबरनाथ रस्ता मार्गी लागणार?
बिल्डरने घेतला जागेचा ताबा
बुलेट ट्रेन : प्रशासनापुढे सेनेचे लोटांगण?
‘मराठा क्रांती मोर्चा’चा ठिय्या

आणखी वाचा