राष्ट्रवादीची जानेवारीत निवडणूकपूर्व तयारीची चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:37 PM2018-12-10T23:37:44+5:302018-12-10T23:39:15+5:30

प्रदेश नेते, निरीक्षकांची उपस्थिती; शरद पवार फेब्रुवारीत करणार मार्गदर्शन; ‘व्हिजन २०२०’साठी टीम सज्ज

NCP's Pre-Preparatory Examination in January | राष्ट्रवादीची जानेवारीत निवडणूकपूर्व तयारीची चाचपणी

राष्ट्रवादीची जानेवारीत निवडणूकपूर्व तयारीची चाचपणी

Next

- प्रशांत माने 

कल्याण : आगामी लोकसभा, विधानसभा आणि केडीएमसीच्या निवडणुका पाहता राष्ट्रवादी काँगे्रसही जोमाने तयारीला लागली आहे. या निवडणूकपूर्व तयारीच्या चाचपणीसाठी जानेवारीत पक्षातर्फे कल्याण लोकसभा मतदारसंघातील चार विधानसभा क्षेत्रांत विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. यावेळी पक्षाचे प्रदेश नेते, निरीक्षक निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेतील. तर, फेब्रुवारीत पक्षाचे सर्वेसर्वा व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे कल्याण-डोंबिवलीत उपस्थित राहून बूथ कमिट्या आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

केडीएमसीत अडीच वर्षांची सत्ता उपभोगलेल्या राष्ट्रवादीची २०१५ च्या निवडणुकीत पुरती वाताहत झाली. पक्षाचे केवळ दोन नगरसेवक महापालिकेत निवडून आले. तसेच अंतर्गत गटबाजी सतावत आहे. नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेत याची प्रचिती आली. ही परिस्थिती पुढे कायम राहिली तर निवडणुकांना सामोरे कसे जायचे, असा मोठा प्रश्न निष्ठावंत कार्यकर्त्यांना पडला आहे.
लोकसभा, विधानसभा आणि केडीएमसीची निवडणूक पाहता पक्षाने ‘व्हिजन २०२०’ हा कार्यक्रम आधीपासूनच हाती घेतला आहे. त्यात कल्याण-डोंबिवली जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी व पदाधिकारी अशी ३५४ जणांची टिम तयार केली आहे. प्रामुख्याने बूथ कमिट्यांद्वारे जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचा, त्यांना भेडसावणाºया समस्यांचा आढावा घेणे, हे त्यामागचे उद्दीष्ट आहे. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात ४०९, कल्याण पूर्वेत ३४५, कल्याण ग्रामीणमध्ये ३८९ आणि डोंबिवली मतदारसंघात ३०३ बूथ स्थापन केले आहेत. सेवादल, वकील, डॉक्टर, कामगार, माहिती तंत्रज्ञान, महिला फ्रंट यासह अन्य विविध सेलच्या माध्यमातून पक्षाचे काम सुरू असताना कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर असो अथवा सहविचार सभा हे देखील ‘व्हिजन २०२०’ कार्यक्रमाचाच एक भाग असल्याचे बोलले जाते आहे.

मात्र, आतापर्यंत केलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी जानेवारीत विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. ६ जानेवारीला डोंबिवली, १३ ला कल्याण पश्चिम, २० जानेवारीला कल्याण पूर्व तर २७ जानेवारीला कल्याण ग्रामीणमध्ये हे शिबिर होणार आहे. या शिबिरांना राष्ट्रवादीचे प्रदेश नेत्यांची उपस्थिती असणार आहे. त्याचप्रमाणे निरीक्षक प्रविण खरात, भरत गंगोत्री, सुहास देसाई आणि सुभाष पिसाळ हे देखील निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेणार आहेत. तर, फेब्रुवारीत शरद पवार कल्याण-डोंबिवलीत मार्गदर्शन करणार आहेत.
दरम्यान, जानेवारीत होणाºया शिबिरांमध्ये प्रदेश नेते व निरीक्षक पक्षातील गटबाजी आणि नाराजीवर काय भाष्य करतात तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कानपिचक्या देतात का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

आम्ही सज्ज आहोत, हनुमंते यांचा दावा
जानेवारीत निवडणूकपूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी चारही मतदारसंघांत विशेष शिबिरे होणार आहेत. फेब्रुवारीत आमचे नेते शरद पवार हे कल्याण- डोंबिवलीत मार्गदर्शन करणार आहेत.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित पार पडल्यातरी आमची तयारी असल्याचा दावा राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते यांना ‘लोकमत’शी बोलताना केला.

Web Title: NCP's Pre-Preparatory Examination in January

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.