मीरा-भाईंदरच्या मोबदल्यात राष्ट्रवादी करणार ठाणे विधानसभेवर दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:25 AM2019-03-29T00:25:36+5:302019-03-29T00:25:57+5:30

लोकसभा निवडणुकीच्या सोयीसाठी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी सोडले आहे. हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याची घोषणाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी केली.

NCP in charge of Mira-Bhyander has claimed in the Thane assembly | मीरा-भाईंदरच्या मोबदल्यात राष्ट्रवादी करणार ठाणे विधानसभेवर दावा

मीरा-भाईंदरच्या मोबदल्यात राष्ट्रवादी करणार ठाणे विधानसभेवर दावा

googlenewsNext

- अजित मांडके

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या सोयीसाठी मीरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसने पाणी सोडले आहे. हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडल्याची घोषणाच राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गुरुवारी केली. आता त्या मोबदल्यात ठाणे शहर विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने चालवली आहे. युतीपाठोपाठ आता आघाडीतही देवाणघेवाण सुरू झाल्याचे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे.
ठाणे लोकसभा निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढू लागली आहे. शिवसेनेने भाजपाच्या नाराज नगरसेवकांची समजूत काढण्यात यश मिळवले असले, तरी त्यातील २१ नगरसेवकांचे अद्यापही मनोमिलन झालेले नाही. एकेक अडचण दूर करून शिवसेना आपली रणनीती आखत असताना, राष्टÑवादीनेसुद्धा हम भी आपसे कम नही, असे म्हणत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यानुसार, गुरुवारी मीरा-भार्इंदरमध्ये राष्टÑवादीने पत्रकार परिषद घेत, मीरा-भार्इंदरची संपूर्ण जबाबदारी ही काँग्रेसचे मुझफ्फर हुसेन यांच्यावर सोपवली असल्याचे स्पष्ट केले. राष्टÑवादीचे नेते गणेश नाईक यांनी हुसेन यांच्या पाठिंब्याच्या बदल्यात मीरा-भार्इंदर मतदारसंघ काँग्रेसला सोडत असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी हा मतदारसंघ राष्टÑवादीकडे होता. परंतु, गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी राष्टÑवादीचे घड्याळ काढत शिवसेनेचे बंधन हाती घेतले. त्यामुळे राष्टÑवादीची तशीही या भागातील ताकद कमी झाली आहे. शिवाय, काँग्रेसकडे येथे १२ नगरसेवकांचे संख्याबळ असून, तब्बल ७० हजारांच्या आसपास मतदार या पक्षाजवळ आहेत. त्यामुळे याचा फायदा घेण्यासाठी राष्टÑवादीने ही शक्कल लढवल्याचे बोलले जात आहे. मीरा-भार्इंदरमध्ये ही रणनीती आखत असतानाच आगामी विधानसभा निवडणूकही आघाडी करूनच लढवण्याची तयारी काँग्रेस आणि राष्टÑवादीने केली आहे. त्यामुळे ठाणे विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे वळवण्यासाठी राष्टÑवादीकडून हालचाली होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्टÑवादी स्वतंत्र लढले होते. त्यावेळी राष्टÑवादीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना २४ हजार ३२० मते मिळाली होती. काँग्रेसचे नारायण पवार यांना १५ हजार ८८३ मते मिळाली होती. परंतु, आता या दोघांनीही भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यामुळे ही जागा आता कोण लढवणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे. तत्पूर्वी २००९ मध्ये हा मतदारसंघ काँग्रेसकडे होता. त्यावेळी सुभाष कानडे यांना ३६ हजार २८८ मते मिळाली होती. परंतु, आता काँग्रेसची ताकद ठाण्यात कमी झाली असून राष्टÑवादीची ताकद बऱ्यापैकी असल्याने येत्या काळात ठाणे शहर विधानसभा क्षेत्रावर राष्टÑवादी दावा ठोकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. किंबहुना, मीरा-भार्इंदरच्या बदल्यात ठाणे असे समीकरणसुद्धा निश्चित झाले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मुझफ्फर हुसेनांनी दिला घड्याळाला हात
मीरा रोड - मोदी सरकारवर शेतकरी, महिला, तरुण, कामगार, व्यापारी आदी सर्वच घटक नाराज असून, या निवडणुकीत जनता आपला क्रोध व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांनी मीरा रोड येथे पत्रकार परिषदेत केली. मीरा-भार्इंदर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडला असून, प्रचाराची धुरा काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांच्यावर सोपवल्याचेही नाईक यांनी जाहीर केले.
न केलेल्या कामांचा ढोल वाजवत मोदी सरकार स्टंटबाजी करत आहे. जनतेची फसवणूक करून संविधान आणि लोकशाहीच नेस्तनाबूत केली जात आहे. नोटाबंदीमुळे रोजगार-व्यापार बुडाल्याचेही नाईक म्हणाले. भार्इंदर रेल्वे टर्मिनस बनवणे, दहिसर-मीरा-भार्इंदर रस्ता आदी अनेक कामेच झाली नसल्याचा आरोप आनंद परांजपे यांनी केला.

धर्म व जातीच्या नव्हे, तर गणेश नाईक, संजीव नाईक, मुझफ्फर हुसेन आदींनी केलेल्या कामांच्या बळावर मते मागणार असल्याचे आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यावेळी म्हणाले. शहरात टीडीआर, आरक्षण घोटाळा १० हजार कोटींचा असून हे घोटाळे लवकरच बाहेर काढू, असा इशारा आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. यावेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार मुझफ्फर हुसेन, राष्ट्रवादीचे दिनकर तावडे आदी उपस्थित होते.

Web Title: NCP in charge of Mira-Bhyander has claimed in the Thane assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.