कशेळीत अंतराळा विषयी माहितीचे व करीअर मार्गदर्शनावर नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांचे एकदिवसीय शिबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 04:05 PM2018-09-24T16:05:08+5:302018-09-24T16:07:41+5:30

कशेळीत अंतराळा विषयी माहितीचे व करीअर मार्गदर्शनावर नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांचे एकदिवसीय शिबीर संपन्न झाले.

NASA scientist Praneet Patil's One-Day Camp on Information and Career Guidance on Terror | कशेळीत अंतराळा विषयी माहितीचे व करीअर मार्गदर्शनावर नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांचे एकदिवसीय शिबीर

कशेळीत अंतराळा विषयी माहितीचे व करीअर मार्गदर्शनावर नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांचे एकदिवसीय शिबीर

Next
ठळक मुद्देकशेळीत अंतराळा विषयी माहितीचे व करीअर मार्गदर्शनावर शिबीरनासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांचे मार्गदर्शनशैक्षणिक शिबीर आयोजित करून समाजाला नवी दिशा देणार - सर्वेश तरे

ठाणे : इंम्पेरीअल सायंटिफिक असोसिएशन आणि कशेळीत युवकांच्या पुढाकाराने ठाण्यातील कशेळी गावात नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील यांचे अंतराळा विषयी माहितीचे व करीअर मार्गदर्शनावर एकदिवसीय शिबीर संपन्न झाले.

कशेळीतील प्रा.कुणाल भोकरे,राजू भंडारी,रोहित तरे,अजित उमराटकर आणि सर्वेश तरे या तरूणांनी आपल्या समाजातील युवकांना काही कारणास्तव शहरी भागातील युवकांप्रमाणे योग्य मार्गदर्शन मिळत नाही यासाठी भिवंडीतील कशेळी गावात हे शिबीर घेण्याचे ठरविले. विशेष म्हणजे या शिबीरासाठी नासाचे शास्त्रज्ञ प्रणित पाटील हे उपस्थित राहिले होते. त्यांच्या सोबत प्रज्ञेश म्हात्रे, हर्षवर्धन देशपांडे (मिशन स्पेस कंट्रोल अँड डिझाईन) तज्ञ,प्रा. रिंकेश कुरकुरे (मास्टर पदार्थ विज्ञान व उर्जा तत्रंज्ञान) तसेच इंम्पेरीअल सायंटिफिक असोसिएशन या नासा सलग्न संस्थेचे सेक्रेटरी सुगम ठाकुर यांनी भिवंडीतील कशेळी गावात येऊ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शास्त्रज्ञ प्रणित पाटील सध्या नासाच्या प्रोजेक्ट पोसमच्या ऍस्ट्रोनट पदाचे कॅन्डिडेट आहेत. गणपतीच्या सुट्टीसाठी ते भारतात आपल्या गावी आले असता आपला अमुल्यवेळ त्यांनी समाजातील युवकांचे उज्वल भविष्य घडावे ह्याहेतू या शिबीरासाठी दिला. या शिबीरात त्यांनी अंतराळातील बर्याच मोहिमांविषयी माहिती दिली सोबत नासात करीअर करण्याच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ह्या वेळे त्यांनी आवर्जून आपल्या आगरी-कोळी समाजाचा उल्लेख करत म्हटले की आपली आगरी-कोळी संस्कृती ही खारेपाटातील म्हणजेच खाडीजवळील संस्कृती आहे. आपल्या जेवणात मीठाचं प्रमाण जास्त असल्याने आपल्यात आयोडिनचे प्रमाण जास्त असल्याने आपली बुध्दी तल्लक असल्याने ती समाजासाठी,माणूसकीसाठी खर्च करा आणि आपल्या समाजाच्या माणसांना शिक्षणाने तिराच्या पलीकडे न्या असे सांगत ‘माझी माणसं रिझर्वेशनसाठी भांडली नाहीत परंतू शिक्षणाने ते स्वताचं प्रिझर्वेशन नक्की करतील असे सांगीतले. आपल्या मुंलीना उच्च शिक्षण घेण्याची खुप इच्छा असते त्यांना लगेच लग्नाच्या बंधनात अडकवण्याची जबरदस्ती करू नका त्यांना शिकू द्या असेही त्यांनी सांगीतले. शिबीराच्या समारोप पर्वात टेलीस्काेप द्वारा उपस्थितांना तारे पाहण्याचा अनुभव मिळाला आणि कार्यक्रमाचा समारोप कशेळीचे माजी सरपंच रामकृष्ण तरे यांनी आभार प्रदर्शनाने केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सर्वेश तरे यांनी केले आणि अश्याच प्रकारचे शैक्षणिक शिबीर आयोजित करून समाजाला नवी दिशा देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: NASA scientist Praneet Patil's One-Day Camp on Information and Career Guidance on Terror

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.