वैयक्तिक कर्जाच्या नावाखाली ठाण्यात अ‍ॅक्सिस बँकेला साडेतीन कोटींचा चुना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 05:15 PM2017-11-29T17:15:43+5:302017-11-29T17:22:01+5:30

५५ ग्राहकांची बनावट कागदपत्रे तयार करून त्यांच्या नावे ३ कोटी ६६ लाख रुपयांची वैयक्तिक कर्ज प्रकरणे ठाण्यातील अ‍ॅक्सिस बँकेतील कर्मचार्‍यानी मंजूर करून घेतली. कर्मचार्‍यानी या गोरखधंद्यासाठी काही दलालांचीही मदत घेतली आहे.

In the name of personal loan, Axis Bank duped by Rs 3 crore! | वैयक्तिक कर्जाच्या नावाखाली ठाण्यात अ‍ॅक्सिस बँकेला साडेतीन कोटींचा चुना!

वैयक्तिक कर्जाच्या नावाखाली ठाण्यात अ‍ॅक्सिस बँकेला साडेतीन कोटींचा चुना!

Next
ठळक मुद्देबनावट कागदपत्रे वापरलीबँकेच्या चार कर्मचार्‍याविरूद्ध गुन्हा दाखलतीन अन्य आरोपींचाही समावेशनौपाडा पोलिसांनी केली कारवाई

ठाणे : बनावट कागदपत्रांच्या आधारे ५५ ग्राहकांची वैयक्तिक कर्ज प्रकरणे मंजूर करणाºया अ‍ॅक्सिस बँकेला ३ कोटी ६६ लाख रुपयांचा चुना लावणार्‍या बँकेच्या चार कर्मचार्‍यासह सात जणांविरूद्ध नौपाडा पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला.
ग्राहकांनी कर्जाचे हफ्ते भरणे बंद केल्यानंतर बँकेने चौकशी केली असता आरोपींनी मार्च ते जुलै २0१६ या काळात ५५ ग्राहकांची कर्ज प्रकरणे गैरप्रकाराने मंजुर करून घेतली असल्याचे उघड झाले. या ५५ ग्राहकांच्या कर्ज खात्यातून आरोपींचे साथीदार निलेश म्हात्रे, प्रशांत किर आणि रविंद्र ठाकूर यांच्या बँक खात्यांमध्ये काही रक्कम वळती झाल्याचेही बँकेच्या निदर्शनास आले.
अ‍ॅक्सिस बँकेच्या ऐरोली येथील शाखेचे तत्कालीन उपव्यवस्थापक सचिन बनसोडे यांनी २९ जून रोजी यासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली होती. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी सखोल तपास केला. त्यानंतर विद्यमान उपव्यवस्थापक सुहास हांडे यांनी याप्रकरणी मंगळवारी नौपाडा पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानुसार बँकेचे कर्मचारी रोहीत भावसर, चेतन सुरेश शेरे, नितीन नारायण घाडीगावकर आणि गिरिष अशोक भोईर यांच्यासह त्यांचे साथीदार निलेश म्हात्रे, प्रशांत किर आणि रविंद्र ठाकूर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

Web Title: In the name of personal loan, Axis Bank duped by Rs 3 crore!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.