जगात 30 हजारांहून अधिक मुलांवर संगीतोपचार सुरू असून त्यांच्यात सुधारणा होत आहे- डॉ. विनोद इंगळहळीकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2018 07:31 PM2018-04-22T19:31:46+5:302018-04-22T19:31:46+5:30

संगीत मुलांच्या मेंदूच्या वाढीमध्ये फरक घडवून आणू शकतो. संगीतामुळे वाचेवर परिणाम करता येतो. संगीतपोचार करून रूग्णाला बरं करता येते. संगीताचा प्रमुख उपचार म्हणून उपयोग होत नसला तरी ते उत्कृष्ट मदतनीस आहे.

Musical Treatment on More than 30,000 children in the world - Dr. Vinod Ingolahikar | जगात 30 हजारांहून अधिक मुलांवर संगीतोपचार सुरू असून त्यांच्यात सुधारणा होत आहे- डॉ. विनोद इंगळहळीकर

जगात 30 हजारांहून अधिक मुलांवर संगीतोपचार सुरू असून त्यांच्यात सुधारणा होत आहे- डॉ. विनोद इंगळहळीकर

Next

 डोंबिवली- संगीत मुलांच्या मेंदूच्या वाढीमध्ये फरक घडवून आणू शकतो. संगीतामुळे वाचेवर परिणाम करता येतो. संगीतपोचार करून रूग्णाला बरं करता येते. संगीताचा प्रमुख उपचार म्हणून उपयोग होत नसला तरी ते उत्कृष्ट मदतनीस आहे. सध्या जगात विशेष आणि विकलांग अशा 30 हजारांहून अधिक मुलांवर संगीतोपचार सुरू आहेत. त्यांच्यामध्ये थोडय़ा सुधारणा होत असल्याचे मत डॉ. विनोद इंगळहळीकर यांनी व्यक्त केले.
    ब्राह्मण सभा,डोंबिवली व वैद्यकीय सेवा समिती यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य वसंत व्याख्यानमाला आरोग्यमंत्र या अंतर्गत ‘सूरा मी वंदिले’ चे आयोजन केले होते. यावेळी डॉ. इंगळहळीकर बोलत होते. ब्राह्मण सभा, टिळक रोड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संगीताचा मानवावर परिणाम व संगीतोपचार दृकश्रव्य माध्यमातून दाखविण्यात आला. यावेळी डॉ. उल्हास कोल्हटकर, वर्षा कोल्हटकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
    डॉ. इंगळहळीकर म्हणाले, बाळ आईच्या गर्भात चौथ्या महिन्यापासून संगीत ऐकू लागते. संगीत हे शेवटर्पयत मानवासोबत टिकून असते. बाळ आई वडिलांना ओळखण्यापूर्वी, शब्द उच्चरण्यापूर्वी संगीताला दाद देत असतो. उतारवयात ही सांगितिक क्षमता टिकून राहतात. पहिल्या व दुस:या महायुध्दांच्या काळात काही संगीताकरांनी रूग्णालयात जाऊन जखमी सैनिकांना विरंगुळ्य़ासाठी संगीत ऐकवतं असतं. त्यांच्या स्थितीत सुधारणा होत होती. त्यामुळे डॉक्टर्स व नर्सेस यांना मोबादला देऊन संगीताचा नियमित वापर होऊ लागला. भारतीय संगीत हे जगात अत्यंत प्रगल्भ संगीत मानलं जाते. भारतात सुमारे 2000 वर्षापूर्वी राग उपचार आणि नाद उपचार पध्दती विकसित झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Musical Treatment on More than 30,000 children in the world - Dr. Vinod Ingolahikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.