म्युज्यू दो अमाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 06:15 AM2018-04-22T06:15:06+5:302018-04-22T06:15:06+5:30

ब्राझीलमधील म्युजू दो अमाना ही वास्तू अशाच प्रवासाची उकल करण्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे.

Museum two amana | म्युज्यू दो अमाना

म्युज्यू दो अमाना

Next

कौस्तुभ कुर्लेकर|


आरंभाचा शोध आणि अंताबद्दलचे कुतूहल मानवी मनाला सातत्याने कोडे घालते. या प्रश्नाचे आपापल्या परीने उत्तर शोधण्याचा प्रयत्न प्रत्येक कलावंत करीत असतो. ब्राझीलमधील म्युजू दो अमाना ही वास्तू अशाच प्रवासाची उकल करण्याच्या प्रवासातील एक टप्पा आहे. तिच्या पाच प्रदर्शनांतून उलगडतो जगण्याचे गूढ शोधण्याचा प्रवास...

म नुष्याला नेहमी आपण कोण आहोत, आपण कुठून आलोत आणि पुढे कुठे पोहोचणार आहोत, हे प्रश्न नेहमी पडत असतात. काही वास्तू या आपल्याला नेहमी पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मदत करतात. अशाच सर्व प्रश्नांना स्पर्श करत त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक प्रयत्न म्युझियम आॅफ टुमारो (म्युज्यू दो अमाना) यास्वरूपात ब्राझीलमधील रिओ-द-जानेरो या राजधानीच्या शहरात पियर माऊआ या भागात केला आहे.
म्युज्यू दो अमाना हे पोर्टो मारिविल्हे या रिओ-द-जानेरोमधील बंदराच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचा एक भाग आहे. या प्रकल्पामुळे हा परिसर सर्वात आकर्षक परिसर बनला आहे.
स्पॅनिश वास्तुविशारद सांतियागो कॅलट्रावा यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे संग्रहालय कॅरिओका संस्कृतीवर (ब्राझीलमधील मूळ संस्कृती) आधारित आहे. कॅलट्रावा यांनी या वास्तूची रचना करताना पाण्यावर तरंगणाºया जहाजाप्रमाणे किंवा भरारी घेणाºया पक्ष्याप्रमाणे अलौकिक अशा स्वरूपात मांडणी केली आहे.
एकूण १५ हजार चौरस मीटर क्षेत्र असलेल्या या संग्रहालयात मुख्य पाच प्रकारची प्रदर्शने आहेत. ज्यात कॉसमॉस, अर्थ, टुमारो, अ‍ॅण्थ्रोपोकिन व अस या दृक्श्राव्यस्वरूपात मानववंशाचा इतिहास आणि भविष्यकालीन वाटचाल मांडली आहे. यामध्ये अभ्यागतांना २७ प्रकारचे प्रयोग करता येतात व ३५ प्रकारचे अनुभव घेता येतात. संग्रहालयाचा दर्शनी ७५ मीटर लांबीचा भाग हा कॅण्टीलिव्हरस्वरूपात बांधण्यात आला आहे. संग्रहालयाभोवती तलाव तयार करण्यात आला आहे. पर्यावरणपूरक अशा नैसर्गिक प्रकाश, सौरऊर्जा इत्यादी गोष्टींचा समावेश या वास्तूत केला आहे. याव्यतिरिक्त संशोधनासाठी प्रयोगशाळा, शैक्षणिक कार्यक्र मासाठी ४०० लोक बसू शकतील, असे सभागृह, उपाहारगृह इत्यादी व्यवस्थाही तेथे आहे.
एकंदर रचना पाहता म्युज्यू दो अमाना म्हणजेच म्युझियम आॅफ टुमारो ही अनोखी वास्तू मानवाला पडणाºया प्रश्नांची उकल करण्यात बºयाचअंशी सफल होते.

Web Title: Museum two amana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :tourismपर्यटन