ठाण्यातील १६ अनाधिकृत हॉटेल्सवर पालिकेचा बुल्डोजर, कोठारीतील बार, हुक्का पार्लर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 05:47 PM2018-01-22T17:47:26+5:302018-01-22T17:50:06+5:30

महासभेत झालेल्या गदारोळानंतर सोमवार पासून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली कोठारी कंपाऊंडमधील बार, हुक्का पार्लर सील करण्यात आले. तर शहरातील वाढीव बांधकाम केलेल्या हॉटेलवर कारवाई करण्यात आली.

Municipal Bulldozers, Kothari Bar, Hukka Parlor Seal, 16 Thousand Unauthorized Hotels | ठाण्यातील १६ अनाधिकृत हॉटेल्सवर पालिकेचा बुल्डोजर, कोठारीतील बार, हुक्का पार्लर सील

ठाण्यातील १६ अनाधिकृत हॉटेल्सवर पालिकेचा बुल्डोजर, कोठारीतील बार, हुक्का पार्लर सील

Next
ठळक मुद्देकोठारी कंपाऊंडमधील ६ हॉटेल आस्थापना सील१० अनाधिकृत हॉटेलवर पालिकेचा बुल्डोजर

ठाणे - मुंबईतील कमला मिल दुर्घटनेनंतर ठाण्यातील कोठारी कंपाऊंडमधील बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्याच्या मागणीवरून शनिवारी झालेल्या महासभेत भाजपा, राष्टÑवादी काँग्रेसने प्रशासनाला धारेवर धरल्यावर ज्या हॉटेल, पबनी दिलेल्या मुदतीत कागदपत्रांची पूर्तता केली नसेल त्यांच्यावर सोमवारपासून कारवाई बडगा उगारण्यात आला आहे. त्यानुसार समोवारी शहराच्या विविध भागात एकाच वेळेस कारवाई करुन ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कोठारी कंपाऊंडमधील अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र नसलेले हुक्का पार्लर्स, लाऊंज बार आणि हॉटेल्स अशा एकूण ६ आस्थापना महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत सील करण्यात आल्या. तर शहरातील जवळपास १० अनाधिकृत हॉटेल्सवर बुलडोझर चालविण्याची कारवाई करण्यात आली.
                 शनिवारी झालेल्या महासभेत प्रश्नोत्तराच्या तासाला भाजपाच्या नगरसेविका मृणाल पेंडसे यांनी कोठारी कंपाऊंडचा मुद्दा उपस्थित केला. तेथील हॉटेल, बार आणि पबवरील कारवाईचे काय झाले, असा सवाल त्यांनी केला. केवळ कारवाईचा दिखावा करुन अभिनंदनचा थाप मिळविण्याचे काम प्रशासनाने केले असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केले होते. परंतु कारवाईचा फार्सच यावेळी झाल्याचा आरोपही त्यांनी केला होता. येथील सर्व आस्थापनांना सप्टेंबर महिन्यात ९० दिवसांच्या आत कागदपत्रे सादर करण्याची नोटीस बजावली होती. ती मुदत २८ डिसेंबरला संपली, त्यांनंतर कारवाई करण्यास घेतली असता हॉटेल मालकांच्या शिष्टमंडळाने आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार त्यांना २० जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली असल्याची माहिती अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी दिली यावेळी दिली होती.
दरम्यान दुसरीकडे कमला मील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरातील ४५८ हॉटेल आस्थापना देखील मागील काही दिवसापासून रडावर आल्या होत्या. आयुक्तांनी दिलेल्या १५ दिवसांच्या मुदतीत शहरातील ५४२ हॉटेल्स आणि बार मालकांनी ना हरकत प्रमाणपत्रासाठी तयार केलेले अर्ज अग्निशमन विभागाकडून घेतले होते. त्यातील अटी शर्थींची पुर्तता करत असल्याचा दावा करत १८० जणांनी अर्ज या विभागाला सादरही केले. मात्र, अग्निशमन अधिकाºयांच्या तपासणीत यातील एकही हॉटेलवाले पास झालेले नाहीत. अग्निसुरक्षेच्या अटी शर्थी जाचक असल्याचे या व्यावसायीकांचे म्हणणे आहे. त्यावर प्रशासनाने तोडगा काढावा अशी विनंती या व्यावसायीकांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे केली आहे. त्यावर चर्चासुध्दा सुरू आहे. मात्र, आयुक्तांनी या आस्थापनांवर देखील सोमवार पासून कारवाई करण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार कोठारी कंपाऊंड मधील हॉटेल, पब लाऊन्स, बार आणि शहरातील ४५८ हॉटेल आस्थापनांवर सोमवार पासून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. महापालिकेच्यावतीने पोलिस बंदोबस्तात सकाळी १० वाजता या कारवाईस सुरूवात करण्यात आली. यामध्ये अग्नीशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने कोठारी कंपाऊंडमधील एमएच ४ पब आणि बार, डान्सिग बॉटल पब, लाऊंज १८ बार, व्हेअर वई मेट, बार इन्डेक्स हे हुक्का पार्लर्स सील करतानाच या ठिकाणी करण्यात आलेले वाढीव बांधकाम तोडून टाकण्यात आले.
दुसरीकडे नौपाडा प्रभाग समिती अतंर्गत देखील करण्यात आलेल्या कारवाईमध्ये पुरेपूर कोल्हापूर, साईकृपा या हॉटेल्सच्या ठिकाणी करण्यात आलेले वाढीव बांधकाम तोडून टाकण्यात आले तर एक्सपिरिअन्स हा टेरेस बार पूर्णत: तोडून टाकण्यात आला. त्याचबरोबर मल्हार सिनेमा येथील दुर्गा बार आणि रेस्टॉरंट तसेच जांभळी नाका येथील अरूण पॅलेस बार अग्नीशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र नसल्याने सील करण्यात आले.
दरम्यान रामचंद्रनगर येथील जयेश हा लेडीज बार पुर्णत: जमीनदोस्त करण्यात आला तर उथळसर येथील फुक्रे बारसह इतर ३ रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली.



 

Web Title: Municipal Bulldozers, Kothari Bar, Hukka Parlor Seal, 16 Thousand Unauthorized Hotels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.