ठळक मुद्देजखमी माकडाची आणि परिसरातील एका कुत्र्याची जमली मैत्री डोंबिवलीमध्ये काही दिवसांपासून माकड मोकाट फिरत

डोंबिवली : मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली येथील पावर हाऊस मध्ये एका माकडाला शॉक लागल्याने तो जखमी झाल्याची घटना गुरुवारी नीदर्शनास आली. काही दिवसांपासून डोंबिवलीत फिरणा-या माकडाचा शोध घेत असताना ठाकुर्ली येथील पावरहाऊस मध्ये दुसरेच माकड जखमी अवस्थेत आढळून आल्याने माकड नेमकी आली कुठून याची चर्चा रंगली आहे.
जखमी माकडाची आणि परिसरातील एका कुत्र्याची मैत्री जमली होती, यामुळे या जखमी माकडाला उपचारासाठी घेवून जाण्यास त्या कुत्र्याने वन विभाग आणि प्राणी मित्रांच्या अंगावर धाव घेतली, माकडाजवळ जाण्यासाठी तो विरोध करीत होता. अखेर या कुत्राला पकडण्यात आले, त्यानंतर त्या माकडावर उपचार करण्यात आले. डोंबिवलीमध्ये काही दिवसांपासून एक माकड मोकाट फिरत होते. या माकडाला शोधण्यासाठी वन विभाग आणि प्राणी मित्र ठीक ठिकाणी गेल्या काही दिवसापासून सापळा रचत कसून शोध घेत आहेत. मात्र त्याच्या शोधात बुधवारी सकाळी ठाकुर्ली येथील रेल्वेच्या ठाकुर्ली पावरहाऊस मध्ये दुसरेच माकड फिरत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती. यानंतर वनविभागाने प्राणी मित्रांच्या मदतीने त्या ठिकाणी धाव घेतली. मात्र ते माकड हाती लागले नाही. पुन्हा गुरूवारी सकाळी वनविभाग आणि प्राणी मित्रांनी त्या ठिकाणी धाव घेत या जखमी माकडाला पकडण्यासाठी गेले असता. माकडाचा मित्र असलेल्या कुत्र्याने प्राणी मित्रांच्या अंगावर धाव घेत होता. यामुळे या कुत्राला पकडून बांधल्यानंतर या माकडाला पकडण्यात आले. मात्र हे माकड विजेचा शॉक लागल्याने जखमी झाले होते. जखमी माकडाला ताब्यात घेऊन त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. तसेच पुढील उपचारासाठी या जखमी माकडाला ठाण्याच्या रुग्णालयात नेणार असल्याची माहिती सांगण्यात आली. या माकडांना कोण्यातरी मदारीने आणून सोडले असावे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.